हिमायतनगर,परमेश्वर काळे| कारला पिचोंडी गावाला स्वातंत्र्य काळापासून आजतागायत ग्रामपंचायत ईमारत नव्हती त्यामुळे निवडून आलेल्या सरपंच यांचे स्वतचे घर भाड्याने घेऊन गावचा कारभार चालवावा लागत होता. परंतु सदरील परंपरा यावेळी मोडीत काढायचा निर्णय घेऊन नव्याने आलेल्या सरपंच सदस्यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती कडे वारंवार मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतची ईमारत मंजूर झाली असून सोमवारी या इमारतीच्या जागेची स्थळ पाहणी विस्तार अधिकाऱ्यांनी केला असून लवकरच भव्य ईमारत उभी राहणार असल्याने गावकऱ्यांसह नागरीकातून समाधान व्यक्त केले आहे.
राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मृती योजनेला मुदतवाढ दिली असून या योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील सात गावाला ग्रामपंचाय ईमारत होणार आहे. कारला पिचोंडी गावाला स्वातंत्र्य काळापासून ग्रामपंचायत ची स्वतची इमारत नव्हती आजपर्यंत येथील ग्रामपंचाय चा कारभार चालवण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच यांचे घर भाड्याने घ्यावे लागत होते. त्यामुळे या पंचवार्षिक नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचाय चे सरपंच सदस्यांनी पहिला ठराव ग्रामपंचाय ईमारतीचा मांडला होता.
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. सदरील इमारत मंजूर करण्यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रयत्न केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मृती योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भाड्याच्या जागेत असणारी ग्रामपंचायत इमारत स्वतच्या जागेवर भव्य होणार असून सरपंच सदस्यांच्या मागणीला यश आले आहे. लवकरच ग्रामपंचाय ची भव्य इमारत उभी होणार असुन पुढील भविष्यातील गावचा कारभार स्वतच्या इमारतीतून सुखकर होणार आहे.
या इमारतीचा स्थळाची पाहणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधिश मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे,प्रमोद टारपे, ग्रामसेवक नारायण काळे,यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.लवकरच प्रस्ताव पाठवून काम सुरू होणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे यांनी दिली यावेळी सरपंच गजानन कदम, उपसरपंच रोशन धनवे,सल्लागार प्रा.डि. डि.घोडगे, सदस्य सोपान बोंपीलवार,अ.रज्जाक भाई,रामेश्वर यमजलवाड, डॉ गफार, दत्ता चितलवाड, तुकाराम कदम गजानन मिराशे,अगंद सुरोशे, राम मिराशे, कैलास कांबळे, साहेबराव घोडगे,व्यंकटराव मोरे,मारोती मेटकर, संजय मोरे,आनंद रासमवाड,यांची उपस्थिती होती.