गोरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि रजाकार पोलिसांच्या विरोधात 8 फेब्रुवारीला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यात गोरक्षणासंदर्भात शासनाच्या आदेशाची विविध शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने रझाकारी पोलीस प्रशासनाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या दि 08 फेब्रुवारी रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोरील धरणे आंदोलनात जास्तीत जास्त गोभक्तांनी सहभागी व्हावे आणि जिल्ह्यात होत असलेल्या गोहत्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी सहयोग द्यावे. असे आवाहन किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी केले आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांनी निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात दिनांक 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा, 1995 लागु करण्यात आला आहे. सदरील कायद्यानुसार गायींची, वळुंची बैलांची आणि शेतीस उपयुक्त व प्रजनन क्षमता असलेल्या प्राण्यांच्या कत्तलीस मनाई आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात व तालुक्यात गोवंशाची कत्तल चालुच आहे. आम्ही प्रशासनाच्या सुचनेनुसार माहीती देउन देखील पोलीस प्रशासनाकडुन स्वयंस्फुर्तपणे कारवाया केल्या जात नाहीत. काही गाडयांवर कैक केसेसस असतांना, त्या गाड्या नियमीतपणे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक करत असतांना त्या गाडयांवर देखील कारवाई जाणीवपुर्वक होत नाही.
तसेच हजारो जिवंत गोवंशाची तस्करी शेजारील तेलंगणा आंध्रप्रदेश या शेजारील राज्यात रात्री १२ ते सकाळी ६ च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात चालुच आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्या पत्रव्यवहाराची दखल घेतली गेली नाही. नांदेड जिल्हयात गोवंशाची कत्तल व कत्तलीसाठी वाहतुक चालुच आहे. म्हणुन आम्हाला नाविलाजास्स्तव लोकशाही मार्गाने दि ०८/०२/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करत आहोत. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
सदरील कायद्यानुसार रक्षक सुधारणा कायदा अंतर्गत या वर्षात आमच्या कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शेकडो गोवंशास जिवनदान दिलेले आहे. त्यादरम्यान गोरक्षक कार्यकर्त्यांनी 4 हल्लाला तोंड दिले आहे. काही गोरक्षक कार्यकर्त्याचे बलीदान झाले आहे. तसेच गोरक्षक कार्यकर्ताना तडीपार करण्यात आला तर दुसऱ्या गोरक्षक कार्यकर्त्याचा तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. या विरोधात पोलीस प्रशासनाने नेहमीच कसायांना आणि गोवंशाची कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात तस्करी करणाऱ्या कसायांना सहानुभूती दाखवली आहे.
या सर्व घटना लक्षात घेता पोलीस प्रशासनाची भुमिका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची राहीली आहे. याचाच विरोध म्हणुन दि 08 फेब्रुवारी 2024 रोजी मा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व गोभक्तांनी रझाकारी पोलीस प्रशासनाच्या विरोधात धरने आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी केले आहे.