नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय धुपा च्या 27 विद्यार्थ्यांची एक तुकडी नांदेड येथील डॉ.आंबेडकरवादी मिशन या संस्थेला भेट देऊन भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याचे यथार्थ मार्गदर्शन मिशनचे प्रमुख डॉ.दीपक कदम सर यांच्याकडून घेतली. दिनांक 15 आॅक्टोबर 2023 रोजी रविवारी हा अभ्यास दौरा संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, प्राध्यापिका सरोज संजय पाटील शेळगावकर प्राध्यापक श्री संतोष कवठेकर सहशिक्षक श्री हिमगिरे सर,सौ.मूर्गे मॅडम,श्री वाघमारे सर उपस्थित होते सुरुवातीला संस्थेच्या वतीने प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी मिशनचे प्रमुख डॉ.दीपक कदम सर यांचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी संपूर्ण होस्टेल फिरून पाहिलं निवासी राहत असलेल्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या मुलींची भेट देऊन त्यांचे अनुभव विचारून घेतले.
अभ्यासिकेमध्ये भेट देऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अभ्यास करत असल्याचे पाहिले, ग्रंथालयाला भेट देऊन ग्रंथांचे वैभव पहिले आणि त्यानंतर सभागृहात विद्यार्थिनींना नांदेडचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि सध्या जर्मनी येथे असलेले आयएफएस डॉ.सुयश चव्हाण यांचे पिताश्री डॉ.यशवंत चव्हाण सर,मिशनचे प्रमुख डॉ.दीपक कदम सर इंग्रजी विषयाचे तज्ञ श्री सिद्धार्थ सर यांनी यथोचित मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे आणि देशाची सेवा करावी असे आवाहन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. याप्रसंगी झालेल्या प्रश्न उत्तराच्या चर्चेत देखील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.
याप्रसंगी प्राचार्य संजय पाटील आणि प्रा.सरोज पाटील यांनी देखील मिशनच्या कामाचं कौतुक करून राष्ट्राच्या उभारणीत डॉ.आंबेडकरवादी मिशन हे मोलाचे योगदान देत असल्याची भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यानंतर विद्यार्थ्यांनी जेवनाचा आनंद घेतला आणि आभार प्रदर्शनाच्या वेळी विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कुमारी सलोनी सय्यद या विद्यार्थिनीने डॉक्टर आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकते असा विश्वास निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आणि मिशनचे धन्यवाद व्यक्त केले.