गंगणबीड व बाभुळगाव येथै जीवा प्रकल्पाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्माननगर, माणिक भिसे। महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेतून लोटस व अपेक्षा हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक –नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील बाबुळगाव व गंगणबीड येथे जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प प्रगतीपथावर आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य विमा योजनेतून मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन दिलीप दमय्यावर ( जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंडित देवदत्त क्षेत्रीय अधिकारी नाबार्ड , डॉ.माधुरी रेवणवार शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी , डॉ.गणेश बंडे म.ज्योतीराव फुले विमा अधिकारी ,सर्जेराव ढवळे कार्यक्रम समन्वयक सगरोळी, डॉ. शुभम हांडे अपेक्षा हॉस्पिटल नांदेड, डॉ.पंकज टोके लोटस हॉस्पिटल नांदेड, सरपंच मुद्रीकाबाई रामदास गीते, व्यंकटराव राहेरकर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक राठोड,भीमराव मुंढे , शेतकरी, नागरिक , यांची उपस्थित होते.
बाबुळगाव व गंगणबीड येथे स्वतंत्रपणे या शिबिराचे आयोजन करून गावातील सुमारे ३५० नागरिकांची तपासणी करून , मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरास लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. या आरोग्य शिबिरात ईसीजी, ब्लड प्रेशर, स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, तसेच शरीराच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.
पात्र रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. डॉ. पंकज टोके,डॉ.शुभम हांडे,गजानन गुरुडे,केशव चोपडे, डॉ.गणेश बंडे, प्रतीक्षा साखरे,प्रतीक्षा राठोड ,नयना देवळे यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती जोगपेटे यांनी आभार मानले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी अविनाश जोगी,विजय भिसे,गंगामणी अंबे,इर्शाद सय्यद आदींनी परिश्रम घेतले.