नांदेड। हडको परिसरातील जे ३ भागातील सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी नरेंद्र दारू पिऊन वाद घालत असल्याने तिन भावांनी संगणमत करून काठीने डोक्यावर मारहाण करून रक्ताचा थारोळ्यात दगडावर पडलेल्याने जबर मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेतील नरेंद्र यांच्या मुत्यु झाल्याची घटना १ आक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली असून या प्रकरणी घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक व ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या सह उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी भेट देऊन डि. बी. पथकाने तात्काळ तिन आरोपींना अटक केली.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,02 आक्टोबर सकाळी 09.00 सुमारास मी माझे सिडको येथील घरी असताना माझा मोठा मुलगा सुरेंद्र हा घरी येऊन मला म्हणाला कि, हडको -3 येथील घरी काल दिनांक 01 आक्टोबर 23 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या .सुमारास आम्ही भाऊ नरेंद्र ,सुरेद्र , सत्येंद्र, राजेंद्र असे घरी असतांना नरेंद्र हा दारू पिऊन सत्यंद्रे यास शिवगाळ करू लागल्याने आम्ही नरेंद्र यास शिवीगाळ करू नको असे सांगीतले असता नरेंद्र कुणाचेही काही ऐकण्याचे मनस्थितीत नव्हता, नरेंद्र याने त्याचे हात लाकूड घेऊन सत्येंद्र याचे अंगावर धाऊन जाऊ लागल्याने आम्ही इतर भाऊ त्यास पकडू लागल्याने आमचे पण अंगावर येऊन शिवीगाळ करून अंगावर येऊ लागल्याने मी व राजेंद्र असे नरेंद्र यास पकडलो. सत्येंद्र याने नरेंद्र याचे हातातील लाकडी काठी घेऊन नरेंद्र यांचे डोक्यात मारले व जमीनीवर असलेल्या दगडावर डोक आपटले त्यामुळे त्यास डोक्यात गंभीर मार लागून जखमी होऊन तो बेशुध्द झाला. नरेंद्र दारुचे नशेत असल्याने तो उठत नसेल त्याची नशा उतरल्यावर तो शुध्दीत येईल असे समजून आम्ही घरात जाऊन झोपलो व तो घराचे गेट चे आत अंगणातच पडुन होता.
आम्ही आज सकाळी 7.00 वा. झोपेतून उठुन पाहीलो असता तो रात्रीचे ठिकाणीच निपचीत पडुन होता. त्यास आम्ही आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता तो उठत नव्हता. तेंव्हा तो मरण पावला असावा असे समजल्याने मी तुम्हाला माहीती देण्या आलो आहे असे सुरेंद्र याने मला सिडको येथील घरी येऊन सांगीतले. त्यानंतर माझे पती बिमार असुन ते नांदेड येथे दवाखान्यात असल्याने मी एकटीच मुलगा सुरेंद्र यांचेसोबत जे-3 हडको येथे घरी जाऊन पाहीले असता माझा मोठा मुलगा नरेंद्र हा घराचे गेटचे आतमधील मोकळ्या जागेत पडुन होता त्याची काहीएक हालचाल नव्हती व इतर दोन मुले हे तेथेच बसुन होती.
आम्ही ग्रामीण पोलीस ठाण्यास सदरची घटना सांगीतली तेव्हा लगेच पोलीस येऊन माझा मुलगा नरेंद्र यास सरकारी दवाखाना नांदेड येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून नरेंद्र हा मरण पावल्याचे सांगीतले. तरी दिनांक 01/10/2023 रोजी रात्री 11.30 वा. चे सुमारास माझी मुले 1) सत्येंद्र 2) सुरेंद्र 3)राजेंद्र यांनी संगणमत करून नरेंद्र हा शिवीगाळ करून लाकडी काठी घेऊन अंगावर धावून आल्याने रागात येऊन सुरेंद्र व राजेंद्र याने नरेंद्र यास पकडून ठेवले व सत्येंद्र याने नरेंद्र याचे हातातील लाकुड घेऊन नरेंद्र याचे डोक्यात मारुन नरेंद्र याचे डोके दगडावर आपटून गंभीर जखमी करून ठार केले तरी त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद मयताच्यी आई पद्मीन बाई ऊर्फ पद्मावती पांडुरंग सुर्यवंशी यांनी दिली.
या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक,सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, उपनिरीक्षक आंनद बिचेवार,ऊपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड,डि.के.जामोदार व डिबी पथक पोलीस अंमलदार यांनी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम ३०२,३४ भादवी नुसार दाखल करण्यात आला.
या प्रकरणी या खुनातील तिन आरोपींना ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस डि. बी. पथकाचे उपनिरीक्षक आंनद बिचेवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, संतोष जाधव, संतोष बेलुरोड, ज्ञानेश्वर कलंदर, प्रभाकर मलदोडे यांनी तात्काळ अटक केली. या घटनेचा तपास उपनिरीक्षक डि. के. जामोदकर हे करीत आहेत, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती.