नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय सिडको ६ अंतर्गत तिन ठिकाणी घाटावर संकलन तर क्षेत्रीय कार्यालय येथे श्री मुर्ती संकलन करण्यात येणार आहेत, असुन नानकसर झरी येथे शहरातील व परिसरातील मुर्ती विसर्जन करण्यात येणार असून या ठिकाणी आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या सह मनपा प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली.
२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्ताने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत चार ठिकाणी मुर्ती संकलन करण्यात येणार असून या ठिकाणी भक्तांन कडे असलेल्या मुर्ती विधीवत पुजा केल्यानंतर संकलन करण्यात येणार आहे , यात नाव घाट वसरणी,साईबाबा मंदीर कौठा,जुना कौठा घाट तर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे श्री गणेश मुर्ती संकलन करण्यात येणार आहेत.
प्रभाग क्रमांक १९ मध्ये ४२ व प्रभाग क्रमांक २० मध्ये २७ सार्वजनिक गणेश मंडळाने नोंद केली आहे, परिसरातील जवळ पास ३० गणपती मुर्ती नानकसर झरी येथे सहा क्रेन व्दारे विसर्जन होणार आहे,मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक,कर्मचारी अधीकारी ,हे संबंधित ठिकाणी सकाळी व दुपारच्या सत्रात जवळपास २६ कर्मचारी राहणार आहेत, विसर्जन ठिकाणी जीवरक्षक दल ठेवण्यात आले आहे, तर घाट परिसरात विघुत लाईट, सि. सी. टि.व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
भाविक भक्तांनी वरील दर्शविला ठिकाणी गणेश मुर्ती देऊन सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे, झरी नानकसर येथे आयुक्त महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त सुंकेवार, स्वच्छता विभागाचे गुलाम सादेक, सहाय्यक आयुक्त बेग,संभाजी कास्टेवाड, अभियंता रफुतुल्ला ,कनिष्ठ अभियंता शिवाजी बाबरे,ऊप अभियंता किरण सुर्यवंशी, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,यांच्या सह ग्रामीण पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या सह मनपा व पोलीस विभाग उपस्थित राहून पाहणी केली.