तालुक्यात मुद्दतबाह्य खाद्यपदार्थाची व जीवनाश्यक वस्तुची सर्रास विक्री; अन्न व औषध प्रशासनाचे दर्लक्ष
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यातील वाई बाजारसह ग्रामिण भागातील अनेक किराणा,दुध डेअरी,डेली निडल्स दुकानातून मुदतबाह्य ( एक्सपायरी ) झालेल्या जीवनावश्यक वस्तू, खाद्य पदार्थची सर्रासपणे विक्री करून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यशी खेळ सुरू आहे. तर या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन कोणतीही कारवाई अशा विक्री केंद्रांवर करीत तर नाही परंतु चांगल्या दर्जाचा खाद्य माल निर्माण करणार्या व बेरोजगारांना काम देण्यार्या कंपणीला माञ ञास देवून त्यांच्याकडून रसद गोळा करुण निघून जात असल्याचा आरोप तालुक्यातील जनेतेकडून केला जात आहे.
माहूर शहरासह वाई बाजार येथे व परिसरात अनेक मोठ मोठी किराणा,दुध डेअरी,डेली निडल्सची दुकाने आहेत, याच दुकानात वितरीत केला जाणाऱ्या वस्तू साठविल्या जातात. जीवनावश्यक वस्तू, सौदर्य प्रसाधने, खाद्य पदार्थ, चॉकलेट,ब्रेड,बँडेड कंपनीचे स्नॅक्ससह अनेक वस्तु अशा सामुग्रीचा मोठा समावेश आहे.परंतु या दुकानात अनेक दिवसापासून विक्री न झालेले व मुद्दतबाह्य झालेले खाद्यपदार्थ विक्री करुण सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यशी खेळत आहे.हा सर्व व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
मुद्दतबाह्य वस्तु विक्री करणे हे कायद्याने गुन्हा असला तरी संबंधीत अन्न व औषध प्रशासनातील काही भ्रष्टअधिकारी व कर्मचारी हेच नियमाला पायदळी तुडवत तसेच अर्थीक देवान घेवान करुण अशा प्रतिष्ठानाकडे दुर्लक्ष करीत त्यांची पाठराखण करीत असल्याचे बोलल्या जात आहे.तर चांगल्या दर्जाचा माल निर्माण करणार्या व रोजगारांना काम देण्यार्या कंपणीला माञ ञास देवून त्यांच्याकडून रसद गोळा करुण निघून जात असल्याचा हि आरोप तालुक्यातील जनेतेकडून केला जात आहे.
कार्यवाही होईल कि लोणी चाकून जातील!
मागील अनेक दिवसापासून वाई बाजार येथील विना परवाना असलेल्या दुध डेअरी केंद्र चालकाकडून भेसळ युक्त दुध विक्री होत असल्याने येथील नागरिकात मोठी भिती पसरली आहे.असे असतांना अन्न व औषध प्रशासन या गंबीर प्रकरणाकडे का दुर्लक्ष करीत आहे.तेव्हा या गंबीर विषयाची दखल घेत प्रशासन कार्यवाही करतील का ? कि फक्त लोणी चाकून जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कस काय साहेब खरं आहे का ?
अन्न व औषध प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकार्याला सोबत घेवून एका कनिष्ठ अधिकार्यांनी माहूर तालुक्यात दौरा केला असल्याची चर्चा असून तालुक्यात कोणत्याच ठिकाणी कार्यवाही झालेली चर्चा किंव्हा बातमी नसतांना नेमके आलेल्या वरीष्ठ अधिकार्याचा दौरा कशासाठी होता ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून झालेला दौरा हा वसुलीचा तर नव्हता असा अंदाज लावून त्यांच्या कार्यप्रणालीवर शंका घेतली जात आहे.