परमेश्वर ट्रस्टचे जेष्ठ संचालक लक्ष्मणरावजी शक्करगे यांच दुःखद निधन; बोरी रस्त्यावरील शेतात अंत्यसंस्कार

हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे जेष्ठ संचालक लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांचं वृद्धापकाळाने शनिवार दि.२२ रोजी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते. त्याची राजकीय कारकीर्द सरपंच, सभापती, जि.प. सदस्य व परमेश्वर मंदिर संचालक अशी होती.
त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, 3 मुल 2 मुली, सुना, पुतणे, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि.२३ रोजी रविवारी दुपारी 12 वाजता उमरखेड – बोरी रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.
लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांच मोठा यांच सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठं योगदान राहिल आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणींना प्राधान्य दिला जायचं. त्यांनी वयाच्या ८३ वर्षापर्यंत राजकीय क्षेत्रात अनेकांना मार्गदर्शन करून अनेक नेते घडविले आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर आपले राजकीय गुरु लक्ष्मणरावजी शक्करगे साहेबानं यांनाच मानतात.
स्व.लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांनी आत्तापर्यंत हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हिमायतनगर शहराचे सरपंच, हुतात्मा जयवंतराव पाटील साखर कारखाना संचालक, श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे जेष्ठ संचालक अश्या पदावर राहून सामाजिक कार्य केला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेकांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात पाय ठेवला आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांना दुःख झालं असून, त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अनेकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी धाव घेतली असून, गावकरी वर्गातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. ते शिक्षक परमेश्वर शक्करगे, राम शक्करगे, पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांचे वडील होते.
