नवीन नांदेड। मनपाच्या एमआयडीसी भागातील डम्पिंग ग्राऊंड वरील कचऱ्याला सततच्या उन्हाचा तापमानामुळे परिसरातील अर्ध्या एकर वरील अनेक ढिगांराना अचानक भीषण आग लागली असुन मोठ्या प्रमाणात आगीचे लोक व धुर मोठ्या प्रमाणात पसरले होते, मनपाच्या व औद्योगिक वसाहती तील अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझविण्या साठी आटोक्यात प्रयत्न होत असुन सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
नांदेड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ऊष्णेतेची प्रचंड लाट असुन काही दिवसांपूर्वी नांदेड शहराच्या ऊष्णेतेचा ऊचांक झाला होता. दि. ८ मे रोजी दुपारी डम्पिंग ग्राऊंड वरील अर्ध्या एकर वरील भागात अचानक दुपारी ३.१३ मिनिटांनी आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ येथील लिपीक संघरत्न राक्षसे यांनी संबंधितांना कळवुन मनपाच्या अग्निशामक व औद्योगिक वसाहतीतील अग्नी शामक दलाच्या सहायाने जवळपास आठ गाडयांच्या सहायाने आग आटोक्यात प्रयत्न चालू झाले असून घटनास्थळी सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक,यांनी भेट देऊन आढावा घेतला असून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू होते.
डम्पिंग ग्राऊंड बाजूला काही अंतरावर वसाहती व गावे आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी मनपा प्रशासन अग्नीशामक दलाचे प्रमुख दासरे व औद्योगिक वसाहत अग्नीशामक दलाचे प्रमुख विमोचक आर.के. वोलीवकर, एम.एम.वाघमारे, एम.जी.राठोड, प्रभाकर मोरे, संदीप सातोकर व चालक मुंडे हे कर्मचारी आग आटोक्यात आणण्या साठी प्रयत्नशील आहेत.दोन अग्नीशामक दलाच्या गाड्या सात ते आठ गाडया फेरया मारून आग विझविण्या साठी प्रयत्न शिल होते.