हिमायतनगर,अनिल मादसवार। हिंगोली लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी विकासाची दूरदृष्टी असणारा उच्चशिक्षित उमेदवार म्हणून जनता खासकरून युवा वर्ग सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ तथा अपक्ष उमेदवार अॅड. शिवाजीराव जाधव यांच्याकडे पहात आहेत, त्यांच्या झंझावात प्रचार दौऱ्याला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित उमेदवाराला संसदेत पाठविण्यासाठी युवा वर्ग प्रचारात उतरला आहे.
ऍड शिवाजीराव जाधव यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा खासदार पाहिजे असा ध्यास धरून अनेक मतदार बांधव त्यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊ असा ठाम विश्वास देतांनाचे चित्र सध्यातरी दिसून येते आहे. हिंगोली लोकसभेसाठी दिनांक 26 रोजी मतदार होणार असून, प्रचार शिगेला पोचला आहे, ते हिमायतनगर शहरात दाखल होताच त्यांनी आराध्य दैवत श्री परमेश्वराचं दर्शन घेतले आणि मतदारांच्या भेटी घेतल्या.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ऍड शिवाजी जाधव म्हणाले की, मी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी कटीबद्द असून, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या पद्धतीने परिसराचा सर्वांगीण विकासासाठी पुढे आलो आहे, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी, आरोग्य यासह सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा यासह विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संसदेत आवाज उठविणार आहे, त्यासाठी जनतेनी मला जनसेवेची संधी द्यावी आणि अंगठी या निशाणीचं बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन संसदेत पाठवावे असे अवाहन करत येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात मतदारांना श्री जाधव यांनी संसदेत गेल्यावर प्रथम प्राधान्याने करण्यासाठी वचनबद्द असलेल्या जाहीरनामा पत्रक वितरित केले, यावेळी त्यांच्यासोबत युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. हिमायतनगर येथून ते किनवट दौऱ्याकडे रवाना झाले.