धर्म-अध्यात्मनांदेड

महाशीवरात्रीच्या पर्वावर लाखो भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्वराचे दर्शन

हिमायतनगर, अनिल मादसवार। वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर नवसाला पावनारा म्हणुन संबध नांदेड जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.08 मार्च शुक्रवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर लाखो भावीकांनी श्री परमेश्वराचे दर्शन जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- तेलंगाना, आंध्रप्रदेशातील भक्तांनी घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. महाशिवरात्री निमित्ताने शहरात सर्वत्र भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखो भावीक भक्तांनी दर्शन घेतले, दर्शनासाठी मध्यरात्री १२ च्या नंतर भाविकांनी रांगा लावून गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने देणंगीदात्यांकडून विषेश सुवीधा म्हणजे, चहा- फराळ, केळी, दूध व शुद्द पाण्याची सोय करण्यात आली होती.
 

देवाधिदेव महादेवाचा उत्सव महाशिवरात्री नीमीत्ताने गेल्या महिन्या पासून जय्यत तयारी सुरू झाली होती, रंगरंगोटी सह मंदिराच्या कळसाच्या, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली. श्री दर्शनासाठी वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भक्तांचे लोंढेच्या – लोंढे श्री परमेश्वर दर्शनासाठी दाखल झाले होते. यामुळे शहरात सवर्त्र भक्तीमय वातावरण निमार्ण झाले असुन, महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु – पदार्थाची सजलेली दुकाने व भक्तांच्या अफाट गर्दीमुळे यात्रेला रंग चढु लागल्याने चित्र दिसुन आले आहेे. महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन 3 वेळा श्री परमेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुने जानकार सांगतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थीत होऊन, श्रीचे दर्शन घेतले. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.सुरेश महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव – पावर्तीचा अभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न झाला. मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्ष तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न झाली.

त्यानंतर लगेच श्रीच्या मुर्तीला अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला, श्री मूर्तीला अलंकार विभुषीत केल्यानंतर दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त मूर्तीवर अलंकार ठेवन्यात येतो. यावेळी अलंकार विभुशीत श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, बाजूबंद, पादुका आणि नव्यानं बनविण्यात आलेलं सोन्याचं नेकलेस आदींमूळ श्री परमेश्वराच सौंदर्य खुलले, अलंकार आभुषने चढविण्यात आली त्यावेळी मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंची प्रामुख्याने उपस्थीती होती.

यामध्ये मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार सौ पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, राजाराम झरेवाड, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुरावजी भोयर, यात्रा सब कमिटीचे सुभाष शिंदे, विठ्ठल ठाकरे, अनिल भोरे, संतोष गाजेवार, कुणाल राठोड, गजानन चायल, ज्ञानेश्वर शिंदे, विपूल दंडेवाड, कल्याण ठाकुर, सुधाकर चिट्टेवार, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, उदय देशपांडे, दत्ता काळे, राम सूर्यवंशी, आशुतोष बोरेवाड, रामराव सूर्यवंशी, राजू गाजेवार, अडबलवाड सर, राजू राहुलवाड, गजानन हरडपकर, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, दत्ता शिराने, सोपान बोंपिलवार, अनिल नाईक, आदींसह विश्वहिंदू परिषद व बजरंग दल, आणि युवा स्वयंसेवक व गावकरी मंडळी उपस्थीत होते.

शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड – बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे लावले जाऊन पुजा- अचर्ना करण्यात येऊन श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला जातो. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ,मराठवाडा, कर्नाटक , आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थित होऊन श्रीचे दर्शन घेतले, यावेळी भाविक भक्तांना विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे दुधाचे वितरण, श्री विश्वकर्मा कारपेंटर एकता युनियन व खाजगी क्लासेस असोसिएशन तर्फे केळीचे वितरण, बुलढाणा अर्बन, महाराष्ट्र बैंक व पवन फर्निचर तर्फे भाविकांना उपवासाच्या फराळाचा साबुदाणा व परमेश्वर मांगुळकर यांनी पारायनार्थी साधकांना चहाचे वितरण करून पुण्य पदरी पाडून घेतले.

मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते दैनिक गावकरी विषेश पुरवणीच प्रकाशन करण्यात आले. दैनिक गांवकरी ने हेमाडपंथी श्री परमेश्वर मंदिराबाबत छापलेल्या लेखाचं अनेकांनी प्रशंसा करून दैनिक गावकरीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!