हिमायतनगर। वाढोणा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास तहसीलदार पल्लवी टेंमकर मॅडम यांनी दि 5 रोजी भेट देऊन महाशिवरात्री यात्रा नियोजन व मंदिर कारभाराचा सविस्तर आढावा घेतला. तसेच भाविकांनी श्री चे दर्शन घेतांना घाई गडबड न करता शांततेत उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील श्री परमेश्वर मंदिराची महाशिवरात्री यात्रा सात मार्चपासून सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज हिमायतनगर च्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. यावेळी येथील विष्णूचा अवतारातील भगवान श्री परमेश्वर मूर्तीच दर्शन घेतल. तसेच यात्रेनिमित्त करण्यात येणाऱ्या जमा खर्चाचा आढावा, मंदिर रंगरंगोटी, सुशोभोकरंण, वार्षिक अर्थसंकल्प आढावा, मंदिराची मालमत्ता, गाळे, भाडे व वसुली, दागदागिने ऑडिट रिपोर्ट ची पाहणी केली.
तसेच यात्रा काळात आयोजित केलेल्या विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह भजन व कीर्तन स्पर्धेच्या आयोजन संदर्भात माहिती घेऊन मंदिराकडून नव्याने बसविण्यात आलेल्या एलईडी बोर्ड, डिजिटल एलसिडी, विद्दुत रोषणाई, आणि उत्सव काळात होणाऱ्या बैलगाडा शर्यत व चालविल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक, शैक्षणिक सामाजिक उपक्रमाच कौतुक केलं, यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, अनिल मादसवार, बाबुराव भोयर गुरुजी, मारोती वाघमारे, अनिल मुधोळकर, किरण माने, राम नरवाडे, गोविंद शिंदे, देवराव वाडेकर, आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.