उमरखेड,अरविंद ओझलवार। मित्रत्वाच्या संबंधाने शिक्षक असलेल्या मित्रास २ लाख रुपये उसने दिले त्यापैकी ५० हजाराच्या बदल्यात दिलेला धनादेश अनादर झाल्याने फिर्यादीने न्यायालयात प्रकरण दाखल केले असता सदर प्रकरणात न्यायालयाने ७६ हजार रुपये अपील कालावधी पूर्वी न दिल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा भोगावी लागेल असा आदेश दिला आहे . न्यायालयाच्या या आदेशामुळे धनादेश अनादर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुसद येथे शिक्षक असलेल्या रूपसिंग फुलसिंग आडे रा भाग्यनगर पुसद यास मित्रत्वाच्या संबंधातून दत्ता मारुती कानकाटे रा धानोरा (सा ) ता उमरखेड यांनी २ लाख रुपये उसने दिले होते त्यापैकी पन्नास हजाराच्या बदल्यात आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र पुसदचा पन्नास हजाराचा धनादेश दिला . आरोपीच्या खात्यात रक्कम जमा नसल्याने सदर धनादेश अनादरीत झाला त्यामुळे तक्रारदार दत्ता कानकाटे यांनी रूपसिंग आडे विरोधात न्यायालयात धाव घेतली .
उमरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयात फौजदारी मुकदमा नंबर 594 /2019 नुसार तो खटला प्रथम श्रेणी न्यायाधीश श्री ए एस शेख यांचे समोर चार वर्ष सात महिने एक दिवस चालला त्यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी निर्णय दिला त्यामध्ये आरोपी रूपसिंग आडे यास न्यायालय उठेपर्यंत शिक्षा दिली व आरोपीने फिर्यादीस धनादेशापोटी 76 हजार रुपये देण्याचा आदेश दिला . सदर 76 हजार रुपये अपील कालावधी पूर्वी न दिल्यास त्या रुपया करिता सहा महिने कैदेची शिक्षा भोगावी लागेल असा आदेश दिला . सदर प्रकरण फिर्यादीतर्फे ऍड संजय जाधव ,ऍड गोपाल भराडे व ऍड महेश वानखेडे यांनी चालवले .