बेलगावकर महाराज यांच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार ज्यांनी दोन वेळा पायी नर्मदा परिक्रमा केली असे तपोमुर्ती परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच्या नर्मदा परिक्रमेला दिनांक 25 फेब्रुवारी रोज रविवार पासून सुरुवात झाली आहे. नांदेड, शेगाव, ओंकारेश्वर, अमरकंटक आणि पुन्हा ओंकारेश्वर असा परिक्रमेतील प्रवास असेल.
परमपूज्य बेलगावकर महाराज यांच्या भागवत कथेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून रुक्मिणी स्वयंवर या दिवशी जमा करण्यात आलेल्या कापडाचे वाटप शुलपाणी येथील जंगलातील आदिवासी बांधवांना सदरील कापडाचे वाटप करण्यात येते. शिवाय नर्मदा परिक्रमेत तीर्थक्षेत्राचे दर्शन, साधू संत दर्शन नर्मदा, नर्मदा मैयाचे महात्मे, संत चरित्र, कथा, भजन, प्रवचन आदी कार्यक्रम होतो. गेल्या अनेक दिवसापासून भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर हे नर्मदा परिक्रमा करून असंख्य भाविक भक्तांना नर्मदा दर्शन घडवून आणतात. यंदा दिनांक 25 फेब्रुवारीपासून नर्मदा परिक्रमेला सुरुवात झाली असून दिनांक 14 मार्च पर्यंत ही परिक्रमा बसने होईल.
दरम्यान रेणुकांबा गोशाळेच्या वतीने गोसेवार्थ विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. याप्रसंगी शिवानंद वट्टमवार, विनोद गंदेवार, सूर्यकांत गुंडाळे, अविनाश मारमवार, पंकज भंडारी, नरेंद्र येरावार, सुनील कामीनवार, दिगंबर लापशेटवार, बालाजी वाघमारे, वेंदात गंदेवार, दिनकरराव जोशी, राजेश्वर गंगावार, किशन गंगावार, हिंगोली येथील डाॅ. गोपाळराव महाजन, डाॅ गुंडेवार, विनायक जकाते, राजेश नेरलकर, महेश वट्टमवार, पांडुरंग पांचाळ, दिपक सोनटक्के, ज्ञानेश्वर गंगावार, तुळशीदास भुसेवार, विजयकुमार बिडवई यांच्यासह अनेक गो भक्त उपस्थित होते.
