महापुरूषाचे विचार आत्मसात करा, पोलीस निरीक्षक आयलाने
नवीन नांदेडl महापुरूषाचे विचार आत्मसात करून शांततेत शिवजयंती साजरी करावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवहान ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी शिवजयंती निमित्ताने आयोजित बैठकीत केले. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवजयंती निमित्त पदाधिकारी मंडळ, पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांच्यी बैठक पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी पदाधिकारी यांनी येणाऱ्या अडचणी अनुषंगाने तक्रारी व मार्गदर्शन झाले.
१६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली, यावेळी अनेक गावातील पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक व राजकीय पदाधिकारी, जयंती मंडळ पदाधिकारी यांच्यी बैठक घेण्यात आली, यावेळी पोलीस निरीक्षक आयलाने यांनी जयंती मंडळाने परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जयंती मंडळ पदाधिकारी यांच्या कडून प्रयत्न झाले पाहिजे,असे सांगितले.
या बैठकीला पोलीस पाटील जयश्री इंगळे, सौ. सुमन खोसडे, सौ.पांचाली डक,सौ. आशा संगेकर,सौ.महानंदा यलगंदलवार, संजय यनावार,व्यंकटी आवातारिक, भास्कर बुद्धेवार, लवकुश आवनुरे, सतिश खराणे,वाघमारे बाळु, टिपरसे संतोष, संजय इंगळे, वैभव देशमुख, गजानन देशमुख, गणेश जाधव, राजेंद्र घुंगराळे,शिवम घोरबांड, प्रकाश घोगरे, दिलीप कदम, सिध्देश्वर पुयड,शिवानंद खोसडे,दिलीप कदम, प्रशांत हबर्डे,अनंत हबर्डे,शेषराव हबर्डे, बाबुराव डक, संजय पुयड, विनोद जाधव,यांच्या सह जयंती मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती सिडको मंडळ अध्यक्ष दिंगाबर शिंदे, यांनी भाषणे केले,तर अनेक गावातील जयंती मंडळ पदाधिकारी यांनी अडी अडचणी संदर्भात चर्चा केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपनीय शाखेचे बालाजी दंतापल्ले, चंद्रकांत बिरादार यांनी सहकार्य केले.