धर्म-अध्यात्मनांदेड
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरास नूतन तहसीलदार पल्लवी टेमकर यांची भेट, घेतले श्री परमेश्वर दर्शन
हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास आज नूतन तहसीलदार पल्लवी टेंमकर मॅडम यांनी भेट दिली. नुकतीच आगामी लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर येथील तहसीलदार गायकवाड यांनी बदली झाली, त्यांच्या जागेवर परभणी येथून टेमकर यांनी हिमायतनगर येथे बदली होऊन, आज त्यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.
त्यानंतर आज तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. यावेळी येथील विष्णूचा अवतारातील भगवान श्री परमेश्वर मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतल. तसेच शिवापती मंदिरातील गर्भग्रहात असलेल्या महादेवाच्या प्राचीन व नूतन शिवलिंगाच दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले. यावेळी त्यांनी शेकडो वर्षांपासून आतित्वात असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात उभी श्रीच्या मूर्तीची व मंदिर परिसराची पाहणी करून ऐतिहासिक परमेश्वर मंदिराची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत परभणी येथील नायब तहसीलदार चव्हाण, हिमायतनगर येथील नायब तहसीलदार ताडेवाड, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, हिमायतनगर येथील मंडळ अधिकारी बाळू नाईक चव्हाण, तलाठी सचिन जावडकर, तलाठी रामचंद्र पुरी, मंदिर कमिटीचे संचालक सौ लताबाई मुलंगे, ज्योतीताई पार्डीकर, संचालक माधव पाळजकर, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, प्रभाकर पळशीकर, राम नरवाडे, वामनराव मिराशे, गणेशराव दिघीकर, सदाशिव सातव, अशोक अनगुलवार, नागेश शिंदे, देवराव वाडेकर, आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी त्या म्हणाल्या की, मी श्री परमेश्वर मंदिराच्या बाबतीत खूप ऐकून होते, एकवेळ भेट द्यावी अशी मनोमन इच्छा होती, आत्ता तहसीलदार म्हणून या ठिकाणी रुजू झाल्याने माझी इच्छा पूर्ण झाली आहे, मंदिरातच्या विकास कामासाठी सर्व सदस्या मंडळींच्या सहकार्याने प्रयत्न करू, तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या महाशिवरात्री यात्रेचा उत्सव देखील आनंदाने पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व मंदिर कमेटिकडून शाल, श्रीफळ, व पुष्पहार श्रीची प्रतिमा देऊन करण्यात आलेल्या स्वागत सत्कार बद्दल धन्यवाद व्यक्त केले.