करियरनांदेड

एसबीआयच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप

नांदेड| स्टेट बॅंक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय नांदेडच्यावतीने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी कार्यक्रमांतर्गत दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद हायस्कूल वाघी इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीचा विद्यार्थीना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी 250 हून अधिक विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला स्टेट बॅंक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय शिवाजीनगर नांदेडचे प्रबंधक (मा.स.)श्री मनोज कुमार साहू, उपप्रबंधक हर्षकुमार नायकलकर, सहाय्यक प्रबंधक सौ किरण लोहारे, श्वेता लखमवाड तसेच संध्या छाया वृद्धाश्रमच्या पाटणी मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बादशाह, तसच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेळगी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!