नांदेड| प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुंषगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय व कै.गणपतराव पाटील बहुउध्देशिय सेवा भावी संस्था, मांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने नायगांव येथे नुकतेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांना फुटपाथ नसलेल्या ठिकाणी उजव्या बाजुने चालावे, अपघात होऊन नये म्हणून घ्यावयाची काळजी, अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या हेल्मेटयुक्त अपघात मुक्त गाव अभियानाची माहिती देण्यात येवून हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी कै.गणपतराव पाटील बहुउध्देशिय सेवा भावी संस्था, मांजरम चे अध्यक्ष श्रीपाद शिंदे पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोड, विजयसिंह राठोड व सहायक मोटार वाहन निरीक्षक धीरज गवळी यांनी परिश्रम घेतले.