हिंगोली। पीकविम्या बाबत हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री अर्जुनजी मुंडा व कृषी सचिवांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ४ लक्ष ६१ हजार शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबत संसदेच्या लोकसभा सभागृहात प्रश्न उपस्थित करून हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. व केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. श्री अर्जुनजी मुंडा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. तसेच कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री मनोज अहुजा यांची पण भेट घेऊन निवेदन दिले. सभागृहात या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन यावर तात्काळ कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील हंगामासाठी एकूण ४ लक्ष ६१ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मागील काही दिवसांपासून अनियमित पावसामुळे हिंगोली जिल्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे उत्पादनात सुद्धा खुप मोठी घट झाली त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात येईल परंतु विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा करुन केंद्र व राज्य शासनाकडे अपील केली.
जिल्ह्यातील उत्पादकता सर्वसाधारण असल्याचा निर्वाळा देत पिक विमा फेटाळला गेला. यामध्ये विमा कंपनी आणि कृषी विभागाचा हलगर्जी पणामुळे अजूनही शेतकऱ्यांना विमा वितरित झाला नाही.यामुळे केंद्र सरकारच्या कृषी विभागाने यामध्ये प्राधान्याने लक्ष घालून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळावा याकरिता केंद्रीय कृषी मंत्री व सचिवांची भेट घेतली.