नवीन नांदेड। खासदारांच्या निधी आरोग्य खात्याकडे वळवून करोना बांधीत देशातील अनेक रूग्नांचे प्राण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मुळे वाचले असुन विकासासाठी भाजपा पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगून मनपा हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ जुना कौठा भागातील पाच कोटी पन्नास लक्ष रूपयांचा मनपा मुलभूत विकास निधी शुभारंभ प्रसंगी केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये नगरसेविका सौ.शातांबाई गोरे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडे केलेल्या मागणीची दखल घेत व सतत केलेल्या पाठपुरावा मुळे मनपा निधी मुलभूत सुविधा अंतर्गत हनुमान मंदिर पाठीमागील बाजुस असलेल्या नदीघाट किनारा साठी एक कोटी व अहिल्याबाई होळकर घाट सुशोभीकरण साठी , मुख्य रस्ता,नाली बांधकाम यासह विविध विकास कामाचा शुभारंभ २० जानेवारी रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी भाजपा अध्यक्ष प्रविण साले,शितल खांडील,सुरेश लोट, नागनाथ स्वामी,एकनाथ धमणे,माजी नगरसेवक गंगाधर बडवणे,मनपाचे अभियंता शिवाजी बाबरे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी,यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं कटीबद्ध असल्याचे सांगून २५ वर्षाच्या काळात जो निधी मिळाला नाही तो निधी या प्रभागात उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक माजी नगरसेवक राजु गोरे यांनी केले, प्रभागाचा विकासासाठी व घाट नदी साठी निधी उपलब्ध करून दिल्या बदल आभार मानले, व विकास निधी देण्याची मागणी केली. नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी या प्र भागासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर माजी महानगर अध्यक्ष प्रविण साले यांनी ही मार्गदर्शन पर भाषण केले.
सुत्रसंचलन डॉ.संदिप काळे तर आभार शिवाजी गोरे यांनी केले. या सोहळ्याला मोहन काळे,व्यंकटराव काळे,पंजाब काळे, ऊतम बुक्तरे,अशोक जाधव,पंडित काळे, शिवाजी काळे,बळीराम काकडे, डॉ. अशोक बोनगुलवार, अपर्णा चितळे, राणी दुबे, मिरा भुजबळ, सुमित्रा सातपुते, कमल बारसे,यांच्या सह महिला नागरिक, युवक यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जुना कौठा भागातील रहिवाशी बालाजी संभाजी काळे हे सि.ए.परिक्षा उत्तीर्ण झाल्या बदल उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.