कंधार येथे २३ रोजी रक्त तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन
कंधार,सचिन मोरे। हल्लीच्या धकाधकीच्या आधुनिक युगात मानवाचे आरोग्य विविध आजाराने ग्रासले आहे.सर्व रोगाचे निदान रक्त तपासणीतून ओळखता येते.यामुळेच आम्ही कंधार तालुक्यातील पंचक्रोशीतील रुग्णांसाठी आई क्लिनिक सिध्दार्थनगर रोड विकासनगर कंधार येथे अगदी अल्प दरात म्हणजे २० ते ३०% मध्ये शरिरातील वरिल रक्तांच्या तपासण्या या सवलतीत केल्या जाणार आहेत,या कार्यक्रमाचे आयोजन दि.२३ जानेवारी २०२४ रोज मंगळवारी केले आहे.या सुवर्ण संधीचा गरजुंनी लाभ घ्यावा.असे आवाहन डाॅ.लक्ष्मीकांत पेठकर यांनी केले आहे.
आई क्लिनिक कंधार येथील द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रक्त तपासणी व आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह(शुगर )रक्तदाब, हृदयरोग,किडनी लिव्हर,त्वचा विकार वात विकार मुळव्याध, खाज,लाल चट्टे यांच्यासह अनेक प्रकारच्या तपासण्या व उपचार करण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक डॉ. लक्ष्मीकांत बालाजीराव पेठकर,संयोजक निर्मल पॅथॉलॉजी लॅबचे बालासाहेब अन्नदाते यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
या शिबिराचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा तसेच तपासणीला येते वेळेस उपाशी पोटी यावे. आपले नाव नोंदणी श्री सद्गुरु मेडिकल स्टोअर्स सिद्धार्थनगर रोड विकासनगर कंधार मो-नं ९४२३५०५४१८ यांच्याकडे करावी असे संयोजन समीतीच्या वतीने कळवण्यात आले आहे.