नवीन नांदेड। पोलीस पाटील भरती प्रक्रिया मध्ये पारदर्शक पणे ऊत्कृष्ट रित्या प्रकिया पार पाडून नव्याने भरती केल्याबद्दल राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल यांच्या वतीने निवासी अपर जिल्हाधिकारी महेश वडदकर ,विकास माने , उपविभागीय दंडाधिकारी नांदेड, यांचे स्वागत करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
असर्जन येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अनेक गावातील रिक्त असलेल्या गावातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर उपविभागीय अधिकारी विकास माने, यांनी अत्यंत पारदर्शक करून पोलीस पाटील भरती प्रक्रिया लेखी व तोडीं परिक्षा झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती केल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी निळा येथील पोलीस पाटील पंढरीनाथ शिवाजीराव जोगंदड, भायेगाव येथील पोलीस पाटील प्रतिनिधी शिवानंद खो सडे उपस्थित होते.यावेळी पोलीस पाटील बकाल यांच्या वतीने नवीन पोलीस पाटील यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.