नवीन नांदेड सिडको। हडको या भागात शिवाजी विद्यालय, सिडको, इंदिरा गांधी हायस्कुल, हडको,कुसुमताई हायस्कुल सिडको,त्या सोबतच वर्दळीचे ठिकाण आणि शाळा व खाजगी शिकवणी वर्ग परिसरात टार्गेटांकडून मोठ्या प्रमाणात मुलींची छेडछाड त्यासोबतच बाहेरील व स्थानिक मुलांकडून नशापान वाढत असून सिडको- हडको भागातील शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुलींना छेडखाणीचे प्रकार, त्यासोबतच दुचाकीवरुन स्टंटबाजी सुध्दा मोठ्या प्रमाणात होत असून पोलीस प्रशासन यांनी यापूर्वीच्या चिडीमार पथकाची निर्मिती करावी व शाळा परिसरामध्ये, खाजगी शिकवणी भागामध्ये गस्त वाढवावी अशी मागणी पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असून दखल घेत शाळा परिसर व परिसरात गस्त वाढवून संबधिता विरुद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
दिलेल्या निवेदनात वर्दळीच्या चौकात शहर वाहतुक तैनात करणे, पोलीस कर्मचारी यांनी नित्याने शाळांना प्रत्यक्ष भेट दयावी, शाळा व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेऊन प्रबोधन करावे,सिडको भागात शाळा,,यापूर्वीची शांतता कमिटी सर्वांगीण रुपाने निर्माण करणे.वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्यात महिण्यातून एक वेळेस समन्वय बैठक आयोजित करावी.
खाजगी शिकवणी भरण्याची वेळात, सुटण्याची वेळात,डी.बी.पोलीस पथकाच्या माध्यामतून बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी नावामनपाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे,वैजनाथ देशमुख, उदय देशमुख,नवनााथ कांबळे,माजी नगरसेवक संजय इंगेवााड,किशोर देशमुख,अशोक मोरे,सतिश बसवदे ,राजु लांडगे,संकेत पाटील, डॉ.नरेश रायेवार,सरपंच पुंडलिक मस्के डॉ.पाटील,बापुसाहेब पाटील, दिगंबर शिंदे, गिरीधर मैैड,गजानन कहाळेकर,अवतार सिंह सौडी,पप्पु गायकवाड, प्रशांत डहाळे,प्रभाकर डहाळे यांच्या सह सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी सामाजिक,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व पत्रकार यांनी केली आहे.