फाईलीचा निपटारा ..कामाचा बोजा ..बाजूला सारत …. अधिकारी रमले… माळेगाव यात्रेत!
लोहा। सतत कामाचा ताण तणाव.. फाईलीचा निपटारा.. अभ्यगंतच्या अडीअडचणी..समस्या..त्याचे निराकरण.. लोकप्रतिनिधी …वरिष्ठांच्या सूचनांची अंमलबजावणी..रुटिंग कामकाज ..असा धकाधकीच्या दिनचर्यातुन थोडा वेळ काढत अधिकारी अस्सल ग्रामीण जीवनाचा आनंद देणाऱ्या माळेगाव यात्रेत रमले..त्यांनी आनंद घेतला…बालपणाच्या अनेक आठवणी एकमेकांना शेअर करत यात्रेत हरखून गेले..
माळेगाव यात्रा ही अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी यात्रा होय.जिल्हा परिषदेच्या मार्फत चालणारी ही यात्रा राज्याच्या इतर अन्य यात्रे पेक्षा तशी आगळीवेगळी यात्रा होय.घोडे-उंट-गाढवांचा बाजार.पशु-कुक्कुट,अश्व श्वान प्रदर्शन तर भरतेच शिवाय नाहिरे वाल्याच्या.. उपेक्षित भटक्या..जाती जमातीच्या भेटीगाठी त्याचे लग्न त्याच्या विचारांची देवाण घेवाण, वाघ्या मुरली, भुते डोंबारी, नंदीवाले, वैदू, राईदर, असा अनेक भटक्या जमाती येथेच खंडोबा रायच्या दरबारात माथा टेकविण्यासाठी येतात.
तमाशा असो की लावणी महोत्सव -कला महोत्सव . आजच्या धकाधकीच्या काळात मनावरील मळभ दूर करते. ताणतणावाला दूर करणाऱ्या यात्रेत अधिकारी रमले. त्यांनाही आपल्या गावच्या जत्रेची बालपणाच्या आठवण आली असा आनंद घेतला
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यंदाच्या यात्रेला आगळंवेगळं रूप दिलं. प्लॅस्टिक मुक्त यात्रा व्हावी असे आवाहन केले.सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकर यासह विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. त्यानी यात्रा फिरून पहिली यात्रेकरू दुकानदार यांच्या अडीअडचणी जाणून घेत पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.मंदिरात शासकीय पूजा केली. लोकनेते स्व विलासराव देशमुख यांच्या “दामिनी” अश्वा सोबत फोटो काढले..शिवाय देवसावरीने पूजन केले त्याच्यासाठी माळेगाव यात्रा हा आगळा वेगळा अनुभव होय.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत याच्या सौभाग्यवती तसेच आई वडील हे यात्रेत रमले. उपजिल्हाधिकारी शरदकुमार मंडलिक, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार ( हदगाव), उपजिल्हाधिकारी श्रीमती देवकुळे, तहसीलदार राम बोरगावकर , तहसीलदार शंकर लाड तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी देवसावरी दिवशी यात्रेचा आनंद घेतला. आवश्यक असलेली खरेदी केली. ताणतणावातून बाहेर येत सुट्टीचा दिवस आनंददायी ठरला .