नायगांव, रामप्रसाद चन्नावार| नायगांव नगरपंचायत येथे विकसित भारत संकल्प यात्रे चा रथ नायगाव येथे आला आसता, नगराध्यक्षा प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच सौ. मंजुषा भगत मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यात भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल – मे,2018 या कालावधीत विस्तारित ग्रामस्वराज्य अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने,” विकसित भारत संकल्प यात्रा ” या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दि.15 नोव्हेंबर,2023 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीत आखण्यात आली आहे.
विविध योजना अंतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजना बद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधने, यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशिलाद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे असे सांगितले, सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक रामेश्वर बापुले,बचत गटाच्या अध्यक्षा सौ महानंदा गायकवाड संभाजी भालेराव.मुन्ना मंगरुळे. प्रताप गायकवाड, माधव क्षीरसागर.रमेश चव्हाण.बंटी सुर्यवंशी. गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर वडगावकर. शेख मौला. श्रीकांत शिरोळे.धनराज वर्णे. इत्यादीने कार्यक्रम यशस्वी करून मौलाचे सहकार्य केले यावेळी नायगाव नगरपंचायत सर्व अधिकारी कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.