नांदेड| महाराष्ट्र सांस्कृतिक कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘कला सन्मान’ पुरस्कार २०२३ देगलूर येथील संगीत शिक्षक पंचशील सोनकांबळे यांना आर्ट बिट्स पुणे यांच्या वतीने नुकतेच प्रदान करण्यात आले.
गतवर्षी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मा.उच्च न्यायालय अंतर्गत ७५ व्यां अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘न्याय सर्वांसाठी’ हे विधी सेवा प्राधिकरण समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य शासन व विधी सेवा प्राधिकरणाद्व्यारे मोफत विधी सेवा दिली जाते.या विषयी देगलूर तालूक्यातील ग्रामीण खेडोपाडी,वस्ती,तांडे,व अति दुर्बल भागात जाऊन तेथील ग्रामस्थांना कायदेविषयक जनजागृती स्वलिखीत गीतांच्या माध्येमातून पंचशील सोनकांबळे यांनी जनजागृती केली.
तसेच आजवर लोकसभा/राज्य सभा मतदान जनजागृती अभियान,सामाजिक कार्य,अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी,हुंडाबळी,ग्राम स्वच्छता,गाव हागणदारी मुक्त,शेतकरी आत्महत्या, या विषयांवर स्व-लिखित गीत,पथनाट्य रचनेतून विविध विषयावर जनजागृती केली आहे.पंचशील सोनकांबळे यांचे सामाजिक उल्लेखनीय योगदान व उत्कृष्ठ कार्याची दखल घेत महाराष्ट्र ‘कला सन्मान’ पुरस्कार २०२३ आर्ट बिट्स पुणे यांच्या वतीने संगीत शिक्षक पंचशील सोनकांबळे यांना यावेळी प्रदान करण्यात आले. कलाकार म्हणून कार्य करीत असताना राष्ट्रीय सेवा सामजिक,शासकीय योगदान हे सतत भविष्यात ही कला क्षेत्रात कार्य करीत नव्या उमेदीने उत्तम कार्य करीत रहावे, यासाठी महाराष्ट्रातील राज्यस्तरावर ‘कला सन्मान ‘ पुरस्कार आर्ट बिट्स पुणे यांच्या वतीने देण्यात येते.
या अगोदर ही २०१५ मध्ये बाल कल्याण पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पंचशील सोनकांबळे यांना उत्कृष्ट लेखन/दिग्दर्शन प्रथम पुरस्कार मिळाले तसेच २०१७ मध्ये महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने ‘कला रत्न ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर लोकसेवा अकॅडमी पुणे च्या वतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२० मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगर अध्यक्ष ॲड.मोसीन अली काझी,यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले तर गंधर्व संगीत विद्यालयाचे सचिव संगीत रत्न पंडित बाबुराव उप्पलवार यांच्या हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले.पुरोगामी अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲड.विलायत अली काझी यांनी सन्मान पत्र देऊन पंचशील सोनकांबळे यांना सन्मानित केले
सुप्रसिद्ध बासरी वादक ऐनोद्दिन वारसी, डॉ.प्रा.भीमराव माळगे, प्रसिध्द तबला वादक प्रकाश सोनकांबळे, शेलेंद्र डागे,केदार देशपांडे, व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सूत्र संचलन वै.धुंडा महाराज महाविद्यालयाचे डॉ.प्रा.भीमराव माळगे यांनी केले तर आभार शैलेंद्र डांगे यांनी केले. देगलूर येथील कला क्षेत्रातील सर्व कलाकर मिञ,परिवाराकडून, पंचशील सोनकांबळे यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.