नांदेड

आज लेंडी धरणावर आ.डॉ.तुषार राठोड यांनी उपोषण कर्त्याशी भेट घेतली

मुखेड| लेंडी प्रधान प्रकल्पासाठी 2362 हेक्टर जमिनीचे भूसंपादन 1995 ते 2007 या कालावधीत झाले होते.जमिनीचे दर 1994-95 यावर्षी निश्चित केले व त्याप्रमाणे भूसंपादनाचा मावेजा दिला गेला.जमिनीच्या दरात वाढ होऊनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला गेला नाही.अत्यंत अल्प दराने प्रकल्पासाठी जमिनींचे संपादन झाले व प्रकल्प 38 वर्ष रखडला.

त्यामुळे,ज्यांच्या जमिनींचे संपादन झाले आहे अशा शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच पॅकेज शासनाने द्यावे,अशी माझी अनेक वर्षापासूनची मागणी आहे.ही माझी मागणी शासनाकडे कायम लावून धरत विधानसभेत बोलतांना अनेकदा उपस्थित केली आहे. मागी झालेल्या 16 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली.. ती बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना तसेच विकास कामांना चालना देण्यासाठी त्या बैठकीमध्ये मोठ्या घोषणा होणार आहे.

लेंडी प्रधान प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी वीस लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा करावी,अशी आग्रही मागणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा. ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे . व याचा पाठपुरावा करून पुढील रक्कम तात्काळ मंजूर करून आपल्या प्रत्येकांना म्हणजे 11 गावातील बाधित क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना ही आग्रीम रक्कम मंजूर करून देऊन.. लेंडी धरणाचे काम पूर्ण करू असे आश्वासन आ.डॉ.तुषार राठोड साहेब यांनी दिले. यावेळी माजी सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकर व्यंकटराव लोहबंदे बालाजी पाटील सकनुरकर हेमंत खंखरे व्यंकटराव पाटील वसुरकर डॉ अमोल कलेटवाड धीरज पाटील गंगाधर पिटलेवाड नागेश पाटील पाळेकर शिवाजी पाटील बोडके कपिल पाटील बनबरे विठ्ठलराव पाटील नागेश गोपनर कमलाकर आगदे नागनाथ पारसेवार जयपाल दापेकर गणेश आंबेकर व गावकरी मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!