वाढोणा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात गणेश मूर्ती व शिवलिंगाची थाटात झाली स्थापना
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| शहरातील बाजार चौकातिल दक्षणिमुखी हनुमान मंदिरात शुक्रवारी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मूर्ती व महादेव पिंडीची प्रतिष्ठापना पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह भजनी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शोभा वाढविली होती.
हिमायतनगर शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात संगमरवरी दगडात बनविलेली गणपती बाप्पाची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आली होती. त्या गणेश मूर्तीचा आणि शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना दि.१५ रोजी शुक्रवारच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यानिमित्ताने सकाळपासून पाच जोडप्यांच्या हस्ते होम – हवन करण्यात आले. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चार वाणीत गणेश मूर्ती व शिवलिंगाची स्थापना तकरण्यात आली. तत्पूर्वी सकाळी अभिषेक झाल्यानंतर 9 ते 11 या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पाच्या मुर्ती स्थापना स्थापना करून पुजा आरती करण्यात आली आहे. त्यांनतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी श्री हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाळू अण्णा चवरे, उपाध्यक्ष संतोष पळशीकर, सेक्रेटरी शिवअप्पा तुपतेवार, यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक बिरप्पा भूसनूर यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ आनंद माने, रमेश पळशीकर, नारायणराव कात्रे, अमोल बंडेवार, शंकर पाटील, निक्कू ठाकूर, सतीश बास्टेवाड, निलेश अप्पा, अतुल तुपतेवार, नाथा पाटील, बाळू सातव, धर्मपुरी गुंडेवार, प्रकाश सेवनकर, अमोल कोटुरवार, राजू राहुलवाड, ययांच्यासह महिला- पुरुष भजनी मंडळ, पोलीस अधिकारी कर्मचारी आदींसह मंदिर सदस्य गावकरी नागरिक मोठ्या सांख्येने उपस्थित होते.