नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे सावरखेड येथील शेतातील आखाड्यावर सोयाबीनची पोते भरून ठेवले होते त्या पोत्याची राखण करण्यासाठी शेतात एक वयोवृद्ध नागरिक झोपले होते .
बाजेवर झोपल्याने अज्ञात चोरट्याने झोपलेल्या शेषराव व्यंकोबा वानखेडे वयोवृद्ध शेतकऱ्याला बाजेला घट बांधून टाकले त्यामुळे त्यांना हलता व आवाजही काढता आला नाही .सदर शेतातील 75000 रुपयाची सोयाबीनचे पोते रोडच्या वर गाडी उभा असलेला गाडीत टाकून पळून नेले अज्ञात चोरट्यावर कुंटूर पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहें.
शेतामध्ये त्यांनी सोयाबीन ठेवलेल्या शेतकऱ्याला बाजेला बांधून त्यांचे 75000 हजाराचे सोयाबीन चोरून नेल्याची माहिती दिली आहे. सदर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गुन्हा नोंद करण्यात आला असून अज्ञात चोरांना पकडण्यासाठी कुंटूर पोलिस तपास करीत आहेत .