
अर्धापूर| ऊस तोडणीत सभासद बिगर सभासद असा भेद कारखान्याला करता येत नाही नोंदीनुसार भाऊराव प्रशासनाने ऊस तोडणी करावी. सभासदांचा ऊस अगोदर तोडणी करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घ्यावा अन्यथा कारखान्याला हायकोर्टात खेचू असा इशारा ऊसदार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी कार्यक्रमातही मनमानी सुरू केल्याच्या अनेक तक्रारी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत. लागवड नोंदीनुसार उस न तोडता सभासदांचा अगोदर नेण्याची भूमिका कारखान्याने घेतल्याच्या तक्रारी अनेक शेतकरी करीत आहेत. कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत सभासद भगर सभासद असा कधीही केला नाही. परंतु आता नव्याने कारभारी झालेल्या काही लोकांनी नियमाच्या पलीकडे जाऊन सभासद भगर सभासद असा भेद निर्माण केला.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात प्रचंड नाराजी असून त्याचा फटका येणाऱ्या काळात अशोकराव चव्हाण यांना नक्कीच बसणार. ऊस तोडणी कार्यक्रम असेल किंवा ऊस दर देण्याच्या बाबतीत कोणीही कारखान्याला सभासद भगर सभासद असा भेद करता येत नाही. असे केल्यास ते नियमाचे उल्लंघन होते. त्यामुळे भावराव चव्हाण कारखान्याने आपला निर्णय तात्काळ मागे घेऊन ऊस लागवड नोंदीनुसारच ऊस तोडणी करावी अन्यथा कारखान्याला उच्च न्यायालयात खेचू असा इशारा रोजगार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे..
