गंगासागर-जगन्नाथ पुरी यात्रा पूर्ण करून ८० यात्रेकरूंचे नांदेड येथे सुरक्षित आगमन
नांदेड। सतत बाराव्या वर्षी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गंगासागर-जगन्नाथ पुरी यात्रा पूर्ण करून ८० यात्रेकरूंचे नांदेड येथे सुरक्षित आगमन झाल्याप्रित्यर्थ नांदेड रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आल्या नंतर यात्रेकरूंनी ढोलताशांच्या गजरात नाचत आनंद व्यक्त केला.
सारे तीरथ बार बार, गंगासागर एक बार या प्रचलित उक्ती प्रमाणे पूर्वी अत्यन्त कठीण वाटणारी गंगासागर यात्रा आता बऱ्याच सुविधा झाल्यामुळे सुलभ झाली.पहिल्या टप्प्यात दिलीप ठाकूर यांच्या समवेत नांदेडसह मुंबई, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, परभणी, लातूर,वसमत व हैद्राबाद येथील ८० यात्रेकरू व ३ टूर मॅनेजर आणि ८ कॅटरिंग टीमचे सदस्य सहभागी झाले होते.आठ दिवसाच्या कालावधीत रेल्वे, बस,बोट,नाव,छोट्या बॅटरीरिक्षाचा वापर करून यात्रेकरुंनी गंगासागर येथे पवित्र स्नान केल्यानंतर कपिलमुनीचे दर्शन घेतले. कोलकाता येथे कालिमाता, बेलूर मठ, दक्षिणेश्वर मंदिर या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.चारोधाम पैकी एक असलेले जगन्नाथपुरी चे दोनदा दर्शन घेतले.पुरी येथे रेतीपासून बनविण्यात आलेली आकर्षक शिल्प संग्रालय पाहिले.
पुरीचे स्वर्गद्वार बीच व चंद्रभागा बीच येथे स्पीड बोट,उंट व घोडा सफारी,एटीव्ही बाईक राईड चा आनंद घेतला.कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्य मंदिराला भेट दिली. नरेंद्रभाई मोदी यांच्या भेटीमुळे आणखी जास्त प्रकाशझोतात आलेले भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिराचे प्रचंड गर्दीत दर्शन घेतले. वातानुकूलीत तृतीय वर्गाचा रेल्वे प्रवास, प्रशस्त दोन बसेस आणि राहण्यासाठी उत्तम हॉटेल मध्ये सुसज्ज रूम मध्ये यात्रेकरूंची व्यवस्था करण्यात आली होती.
दिलीप ठाकूर यांनी वेळोवेळी घेतलेले मनोरंजक खेळ, अंताक्षरी, प्रत्येक प्रवाश्यांवर केलेले मार्मिक विनोद यामुळे प्रवासाची रंगत वाढली.ठाणे येथील कॅटरिंग टीमने रुचकर महाराष्ट्रीयन भोजन व मिनरल वॉटर वेळेवर व मुबलक प्रमाणात दिल्यामुळे सर्वांची प्रकृती चांगली राहिली.संदीप मैंद,विशाल मुळे यांनी योग्य नियोजन केले. प्रवासादरम्यान किरण मोरे, लक्ष्मीकांत जोगदंडे यांनी सर्वांची वैयक्तिक काळजी घेतली.सुखरूप आलेल्या यात्रेकरूंचे नांदेड रेल्वे स्थानकावर ढोल ताश्याच्या गजरातजल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी नांदेड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते.
भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने २२ जानेवारीला गंगासागर यात्रा,सात मार्चला अयोध्या काशी,तेरा मार्चला हिमाचल,अकरा एप्रिलला नेपाळ, पंचवीस एप्रिलला गुजराथ, पंधरा मे ला चारोधामला रेल्वेने यात्रा जाणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली.प्रतिकूल परिस्थितीत देखील दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने अंत्यत नियोजनबद्ध व्यवस्था केल्याबद्दल सर्व यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केले.