नायगाव| रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नायगांव येथिल स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत काही शेतकरी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन गेले होते. शेतकऱ्याच्या बचत खात्याला का होल्ड लावत आहात, पीक कर्ज वेळेवर का देत नाही अश्या विविध प्रश्नाचा भडीमार करत मॅनेजरला धरले धारेवर .
यावेळी संबंधित लेखी निवेदन देण्यात आले, त्या निवेदनात असे म्हटले आहे की, नायगाव तालुका नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे बचत खाते हे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये आहे. शेतकऱ्यांचे विविध अनुदाने, सबसिडी, किसान सन्मान योजनेचे, पिक विमा व जमा केलेली रक्कम बँकेमध्ये सेविंग खात्यामध्ये जमा आहे. राष्ट्रीयकृत बँका ह्या शेतकऱ्यांना थकित पिक कर्ज नावाखाली शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करून त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे उचलण्यास प्रतिबंध घालत आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसार बचत खात्यावर होल्ड करण्याचा अधिकार हा बँकांना नाही. त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की,नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांच्या हॉल्ड उठवण्यात यावे. शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत, अत्यंत कठीण काळात जीवन जगत आहे, त्यांच्यावर आणखी मानवी निर्मित संकटात टाकू नका ही विनंती.
पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या – १) शेतकऱ्यांचा बचत खात्याचे होल्ड उठवण्यात यावे. २) के.वाय.सी खाते करण्याची पद्धत गावपातळीवर असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राला अधिकार देण्यात यावे. ३) पिक कर्ज तात्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. ४) बँकेतील खात्यावरून कितीही रक्कम उचलण्याचा अधिकार हा खातेदाराचा आहे ,त्यावर मर्यादा घालू नका.
रयत क्रांती संघटनेच्या दणक्याने सोबत आलेल्या शेतकऱ्यांचे होल्ड काढण्यात आले, उर्वरित शेतकऱ्यांचे होल्ड करण्यात येईल असे आश्वसथ केले गेले. पांडुरंग शिंदे यांनी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला सुद्धा भेटून निवेदन दिलेले आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, बालाजी पा.कदम,राजू मेत्रे, विठ्ठल शिंदे, पप्पू शिंदे, साहेब डोनगावे, भाऊसाहेब पाटील , नारायण कदम ई उपस्थित होते.