नांदेडमहाराष्ट्र

19 कोटींतील 80 टक्के रक्कम खर्च होऊन हिमायतनगरची जनता तहानलेली; पाणी मिळाले नाहीतर एकमेकांचे डोके फोडून घेण्याची वेळ येणार

हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १९ कोटीच्या निधीतुन मागील ७ वर्षांपासून नळयोजनेचे काम सुरु झाले. कंची मुद्दत संपली तरी नळयोजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शहरातील नळयोजनेचे काम ठेकेदार, अभियंता, मुख्याधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेला दिवाळी पर्वापासूनच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात पाण्यासाठी एकमेकांचे डोके फोडून घेण्याची वेळ येणार आहे. हि बाब लक्षात घेता पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ पूर्ण करून जनतेची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अन्यथा नगरपंचायतच्या विरोधात नागरिक लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान पत्रकारांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निदर्शनास अर्धवट नळयोजनेच्या कामाची बाब लक्षात आणून दिल्यानंतर जवळगावकर यांनी मुख्याधिकारी ताडेवाड याना सूचना देऊन सोमवारी बैठक बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

हिमायतनगर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत १९ कोटीचा निधी मंजुरी होऊन मागील ७ वर्षांपासून पाणीपुरवठा नळयोजनेचे काम मंगरूळ येथील बंधाऱ्यावरून सुरु आहे. शहरातील लोकसंख्या ३० हजाराहून अधिक असून, होत असलेल्या नळयोजनेच्या जलकुंभाच्या संख्येवरून या सर्वाना पाणी मिळण्याची शकता कमी असल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत. प्रत्यक्षात ७ वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या नळयोजनेचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने शहरातील नागरिकांना दिवाळीच्या पर्वकाळात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. नळयोजनेचा काम सुरु होण्यापूर्वी शहराच्या चारही बाजूने ४ ते ६ ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे अनिवार्य होते. काम सुरु झाल्यापासून केवळ तीन टाक्या उभारण्यात आल्या. त्याचेही काम अर्धवट स्थितीत असून, एकाच ठिकाणी दोन टाक्या बांधल्या असल्याचे प्रत्यक्षात दिसते आहे.

बोरगडी रोडवरील त्या जलकुंभाची क्षमता ३.६० लक्ष लिटर असून याचं ठिकाणी आणखी एक जलकुंभ उभारले गेले असून, हे काम अजूनही पूर्णत्वास गेले नाही.  किनवट – नांदेड रोडवरील बंडेवार यांच्या ले-आउट मधील न.पं.च्या जागेत ५ लक्ष लिटर क्षमतेची एक टाकी होणार होती, मात्र त्या टाकीची जागा बदलनाचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात आहे. तर फुलेनगर येथे ६० हजार लिटर क्षमतेची टाकीचे काम झाले असून, येथील टाकीचे बांधकाम चक्क एका शेतात करण्यात आले आहे. जलकुंभाच्या कामाची म्हणावी तशी क्युरिंग झाली नसल्याने जलकुंभाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोहम्मदिया कॉलनी भोकर रोड येथे ५० हजार लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार असून, आणखी एक टाकी शहरातील वरद विनायक मंदिराच्या परिसरात घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंत्तू प्रत्यक्षात या ठिकाणी कामाला सूरवात झाली नसल्याचे दिसून येत आहे.

अद्यापही या भागात टाकीचे काम सुरु झाले नसल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक, ०२,०१, १२, ११, ०८ आदी वॉर्डातील नागरिकांच्या पाण्याची सोय कशी होणार..? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण या भागात पाण्याचा पुरवठा करायचा म्हणजे श्री परमेश्वर मंदिर परिसरात असलेल्या नगरपंचायतच्या स्पेसमध्ये आणखी एक जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. परंतु याकडे संबंधित मुख्याधिकारी, अभियंत्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने १९ कोटीची हि नळयोजना ठेकेदार, अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी राबविण्यात येते आहे कि काय..? असा प्रश्न शहरवासियांतून उपस्थित केला जात आहे.

एव्हडेच नाहीतर शहरातील काही भागात आणखी पाईपलाईन तर झालीच नाही जिथे चालू आहे, तेथील काम अर्धवट ठेऊन इतर वॉर्डात पाईपलाईन करण्याचा घाट करून दोन – तीन वर्षांपासून रस्ते खोदून ठेवल्यामुळे शहरात धुळीचे आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधील फुले नगर भागात सुरु असलेल्या जलकुंभाचे काम अत्यंत निकृष्ट झाले असल्याची ओरड नागरीकातून होत आहे. कारण झालेल्या टाकीचे कामावर मजबुतीकरणासाठी पाणी टाकले गेले नसल्याने कोणत्याही क्षणी हे जलकुंभ कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या पाण्याच्या टाकी अखत्यारीत येणाऱ्या बऱ्हाळी तांडा, फुले नगर भागात पाईपलाईन अर्धवट अवस्थेत असंल्याने १९ कोटी खर्चूनही शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेल कि..? नाही अशी साशंकता नागरीकातून व्यक्त केली जात आहे.

कारण गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्हाळी तांडा येथील नागरिकांची दिवाळीनंतर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. आजही या नागरिकांना २ किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. तरीदेखील या भागाकडे नळयोजनेच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्याऐवजी मुख्यअधिकारी, अभियंता व ठेकेदार यांनी मनमानी पद्धतीने थातुर माथूर नळयोजनेचे काम करून देयके काढण्यासाठी धडपड सुरु केल्याचे दिसत आहे. मंजूर निधीपैकी आत्तापर्यंत ८० टक्के निधी खर्च झाला असून, आता निधी अपुरा पडत असल्याचे कारण समोर ठेऊन पुन्हा निधी मंजूर करून स्वतःची तुंबडी भरण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी ठेकेदार व अभियंत्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया नळयोजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विकासप्रेमी जनतेतून व्यक्त केली जात आहे.

एकूणच शहराचा कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमतः शहरातील सर्वच बाजूने ५ ते ६ जलकुंभ होणे गरजेचे असून, त्यासाठी अगोदर ज्या पैनगंगा नदीकाठावरून नळयोजना मंजूर झाली त्या ठिकाणी जलसाठवणीचे टाके बांधणे गरजेचे आहे. त्या टाक्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी बांधकाम अर्धवट असल्याने केवळ शासनाचा पैसे जिरविण्यासाठी शहरात १९ कोटीच्या पाणी पुरवठ्याचे काम केले जाते कि काय..? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. एकूणच नळयोजनेच्या अर्धवट कामामुळे शासनाच्या पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असून, यास संबंधित ठेकेदार, मुख्याधिकारी आणि देखरेख करणारे नगरपंचायतीचे अभियंता जबाबदार असल्याचा आरोप विकासप्रेमी जनता आणि गेल्या ५० वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यातून केला जात आहे.

सोमवारी बैठक बोलावण्याचे जवळगावकरानीं दिले मुख्याधिकाऱ्यांना आदेश

हिमायतनगरातील नळयोजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवाळीपर्वापासूनच पाणी टंचाईची समस्या सुरु झाली, आगामी काळातील निवडणूक लागण्यापूर्वी पाणी पुरवठा सुरु व्हावी म्हणून हा प्रश्न पत्रकार अनिल मादसवार यांनी जवळगावकर यांच्या निदर्शनास आणून दिला. लागलीच आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी नळयोजनेच्या कामाची संदर्भात येत्या सोमवारी बैठक बोलावण्याचे आदेश मुख्याधिकारी श्री तांडेवाड याना दिले असून, ठेकेदार व अभियंता आणि संबंधितांना या बैठकीत बोलवावे असे सूचित केले आहे. यामुळे हिमायतनगर शहरातील अर्धवट नळयोजनेच्या कामाला गती मिळून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खरोखर प्रयत्न होतील का..? याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे. यावर उपपयोजना झाल्या नाहीतर आगामी उन्हाळयात शहरातील जनतेत पाण्यासाठी एकमेकांचे डोके फोडून घेण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!