नवीन नांदेड। सिडको परिसरातील गुरूवार बाजार शंकर नगर परिसरातील जेतवन व नालंदा बौद्ध विहार परिसरातील मुख्य रस्त्यासाठी ५० लक्ष रूपये निधीची घोषणा करून सार्वजनिक कामे,उत्सव,सण यासाठी गुरूवार बाजार मैदानात लवकरच पेव्हर किंवा सिमेंट काँक्रिट विकासासाठी कटिबद्ध असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी न्यु वैष्णवी दुर्गा मंडळ येथे सदिच्छा भेट प्रसंगी केले.
सिडको परिसरात १९ आक्टोबर रोजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी माजी नगरसेवक संदिप चिखलीकर, किशोर यादव,संजय पाटील घोगरे,संदीप पावडे,सुरेश जोशी,राजु निखाते,यांच्या सह सामाजिक ,भाजपा पदाधिकारी, उपस्थित होते,हडको परिसरातील बालाजी मंदिर देवस्थान येथे भेट देऊन २१ वा ब्रम्होत्सव निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम बाबत माहिती घेतली, यानंतर विधीवत पुजन करून आरती केली, मंदिर विश्वस्त अरूण दमकोडंवार, संतोष वर्मा, बालासाहेब मोरे, व पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
सिडको परिसरातील गुरूवार बाजार येथील न्यू वैष्णवी दुर्गा मंडळ येथील मंडळास भेट दिली या वेळी जेतवन बौद्ध विहार ते नालंदा विहार परिसरातील मुख्य रस्ता साठी ५० लक्ष रूपये निधी देण्याची घोषणा केली, यावेळी मंडळाचे अध्यक्ष जितुंसिग टाक, दिपक पंढरी पाटील, राजु लांडगे,रमेश ठाकूर,विजय करडे,सुरेश जोशी,निकिता शहापुरवाड यांच्या सह पदाधिकारी यांनी खा. चिखलीकर यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरूवार बाजार परिसरातील मोकळया जागेत धार्मिक ,उत्सव, सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने लवकरच परिसर विकसित करून सिमेंट काँक्रिट, किंवा पेव्हर करण्यात येतील असे आश्वासन खा. चिखलीकर यांनी सांगुन आयोजित गरबा दांडिया ही खेळला यावेळी मोठ्या प्रमाणात युवक, महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.