
नांदेड| ग्रामीण भागातील महिला चूल आणि मुलं एवढ्यापुरताच मर्यादित राहिल्या नसून, त्यांनी आज सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. अशा कर्तृत्वाने महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने युवा साहित्यीक सोनू दरेगावकर यांनी त्यांचे वडील माजी. सरपंच स्वर्गीय जनसेवक बबन खंडू दरेगावकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ दरेगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४३ महिलांचा “गावची नाळ” पुरस्कार देवून सन्मान केला. त्यांनी राबविलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
दरेगाव ता. नायगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी, तसेच स्वर्गीय जनसेवक बबन दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ हा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी गावातील महिला सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, शालेय समिती अध्यक्ष, माली पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जिल्हा प्राथमिक शाळा दरेगाव सेविका अशा एकूण ४३ महिलांना गावची पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या माजी वच्छलाताई पुयड, पोलीस अधिकारी सविता हुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मीनाक्षी कागडे, डॉ. शोभा वाळूक्कर, ज्योतीताई पावडे, जयश्री जयस्वाल, उज्वला राठोड, पूजा बिसेन, कलावती घोडके, सीमाताई वाघमारे, शालूताई तालीमकर, संगीताताई परडे, सुरेखा चोंडे, गैहेरवार दीदी, अनुराधा वैजवाडे, शोभाताई झुडपे, सुवर्णमाला शिंदे, कल्पना बेंद्रीकर, सविताताई पाचंगे, प्रेमिला कांबळे, फरजानाबी सादक शेख यांच्यासह शेकडो महिला आणि पुरुषांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य आयोजक सोनू दरेगावकर यांनी केले तर आभार प्रा. संतोष आमनवाड यांनी मांडले.
