कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडकोने मुलांत रूजवला वृक्षारोपनाचा अमुल्य संस्कार..

नवीन नांदेडl आषाढी महोत्सवाचा आनंद द्विगुणित करत कुसुमताई माध्यमिक विद्यालयाने मुलांसमोर 500 सावली व फळझाडे लावण्याचा संकल्प केला होता. मुलांनी 700 झाडे आणून उच्चांक गाठला.
प्रशालेतील असंख्य विध्यार्थी टाळकरी, वारकरी वेषात येऊन, हातात वृक्ष घेऊन झाडे लावा जीवन वाचवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे,कोरोना काळ विसरू नका आक्सीजनविना मरू नका असा जयघोष देत मुलांनी वृक्षदिंडीत सहभागी होऊन सिडको-हाडकोतील वातावरण भक्तीमय तथा निसर्गमय झाला होता.
पैसे मुलांचे, झाडे मुलांचे, लावणार आई-वडिलांच्या हस्ते, ते ही आपापल्या परीसरातकुसुमताई ने फक्त वृक्षलागवडीचा संस्कार दिला.
या उपक्रमासाठी संस्थेचे सचीव संभाजीराव बिरादार , मुख्याध्यापीका सौ शशिकलाताई जाधव- बिरादार यानी मार्गदर्शन केले तर पर्यवेक्षक शेख निजाम गवंडगावकर व सौ. उज्वला सावते यांनी वृक्षरोपनाचा संकल्प केला होता.
या उपक्रमासाठी सांस्कृतिक प्रमुख विश्वास हंबर्डेसर, सौ वंदना सोनाळे ,सुर्यकांत वडजे,एस.डी .जाधव, नरसिंग यलमलवाड, सौ.चारूशीला देशमुख, लक्ष्मण येसके, युवराज शिंदे ,माधुरी माकणे यांनी परीश्रम घेतले. शेख निजाम गवंडगावकगवंडगाव
