नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आयोजित इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, ता. मुखेड जि. नांदेड संचलित शिवाजी विद्यालय,सिडको नवीन नांदेड या विद्यालयातील तब्बल 31 विद्यार्थी यंदा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेली आहेत, पुन्हा एकदा उच्च गुणवत्ता,सुयोग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थी व शिक्षक यांची मेहनत ही स्पर्धा विषयक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे यश असल्यामुळे सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक होत आहे.
या परीक्षेत इयत्ता पाचवीचे 17 विद्यार्थी पात्र ठरले असून इयत्ता आठवीचे 14 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. इयत्ता पाचवीतील गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे उमाटे समर्थ गजानन 120,मस्के प्रथमेश रामचंद्र 168 ,कु. ताटे श्रद्धा राजेश 166 ,पाकलवाड वेदांत विलास 160, गोरे वीरेंद्र विद्याधर 156 ,पांडे क्षितिज प्रताप 154, नाईकनवारे वृषांक वसंत 146 ,कु.वाघमारे विजया विश्वनाथ 144, कु.आढाव आराध्या व्यंकटी 144, सूर्यवंशी सोहम राम 142 ,कु.चालिकवार श्रेया विलास 140 ,कु.कदम श्रुती उमाकांत140, कु.मलमवार धनश्री राहुल 138, कु. नारनाळे तनुजा उत्तमराव 128, कु.मोरे अंजली शिवाजीराव 124, कु. आगलावे आराध्या माधव 122 .
तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र व गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे कु.वैभवी ओमप्रकाश सुत्रावे 242, कु.शिवांगी अशोक मळगे 222,कु.सायली संतोष दासरवार 204, कु.साक्षी शिवाजीराव 200, कु.नंदिनी संजय बाचे 198, कु.सेजल रमेशराव पुयेड 194 ,कु. श्रेया रामकिशन गिरडे 188, कु. श्रावणी जीवन पानपट्टे 182, समर्थ गजानन शिंदे 180, लक्ष्मीकांत गजानन लोसरवार 178 ,कु. प्रार्थना देवेंद्र त्रिपाठी 176, कु. धनश्री गोविंद तेलंग 176, कु संजीवनी बालाजी कांबळे 146, कु.आनंदी शैलेश लोहगावकर 144 यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवी जाधव, प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील, वरिष्ठ लिपिक वसंत वाघमारे,स्पर्धा परीक्षा प्रमुख चंदनशिवे व श्रपावड पावडे तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.