अयोध्येतील ५१ घाटांवर २४ लाख दिवे, डोळ्यांनी दिपवून टाकणारे
लखनऊ। अयोध्येतील दिवाळी नेहमीच काहीतरी विषेश असते. यावर्षीच्या दिवाळीत देखील अयोध्यानगरी तब्बल २४ लाख दिव्यांनी उजळून निघाली आहे. अयोध्येतील ५१ घाटांवर २४ लाख दिवे लावण्यात आले. असून, डोळ्यांनी दिपवून टाकणारे हे दृष्य होते. यावेळी प्रभू श्रीराम आणि सीता माता १४ वर्षांच्या वनवासातून परतल्याचा देखावा तयार करण्यात आला होता.
शनिवार ११ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीच्या पुर्वसंध्येला अयोध्येत भव्य दीपोत्सव पार पडला. यावेळी सुंदर देखावा तयार करण्यात आला. यादरम्यान प्रभू श्री राम आणि सीता माता यांची वेशभूषा साकारलेले कलाकार हेलिकॉप्टरमधून खाली उतरले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या प्रतिकात्मक प्रभू राम आणि सीतेची पुजा केली.
त्यानंतर सरयू नदीची आरती करण्यात आली. आरतीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘ग्रीन अँड डिजिटल फायरवर्क्स’ शोमध्ये गेले. याठिकाणी लाखों दिव्यांनी अयोध्यानगरी सजली होती. अयोध्येतील ५१ घाटांवर २४ लाख दिवे लावण्यात आले होते. अयोध्येतील या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली आहे.
यासोबतच भगवान श्रीरामाच्या १४ वर्षांच्या वनवासाची छायाचित्रे सरयू घाटावरील स्क्रीनवर दाखवण्यात आली. याठिकाणी तयार करण्यात आलेल्या दृष्यात पुष्पक विमानातून उतरल्यानंतर राम आणि लक्ष्मण यांचे भरत आणि शत्रुघ्न यांनी स्वागत केले, त्यानंतर ते गुरु वशिष्ठांसह रथावर बसले आणि रामाच्या दरबारात निघाले. या रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठ यांनी प्रभू रामांचा रथ ओढला.