उस्माननगर,माणिक भिसे। उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता. लोहा येथील 35 वर्षीय शेतकऱ्यांने सतत होणाऱ्या नापीकेमुळे व स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतामध्ये दुपारी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केल्याने विष्णुपूरी येथील सरकारी दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पोलीस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार पोखरभोसी ता.लोहा येथील दशरथ बालाजी ताटे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा मयत भाऊ संतोष बालाजी ताटे वय ३५ वर्षे रा. पोखरभोसी ता. लोहा यांच्या आईच्या – वडिलांच्या नावावर शेतीच्या कामासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा लोहा येथून सात वर्षांपूर्वी ५८ हजार रुपये वडिलांच्या नावाने कर्ज घेतले होते तर तीन वर्षांपूर्वी आईच्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धावरी तालुका लोहा येथून ४८ हजार रू.कर्ज घेतले होते.
सततच्या शेतीच्या नापिकीमुळे कर्ज फिटत नसल्यामुळे व याही वर्षी पाण्या अभावी वाळून पिके वाळून जात असल्याने छोटा भाऊ नेहमी घरामध्येव आई – वडिलांना नेहमीच बँकेची कर्ज कसे फेडावे असे म्हणत असायचा , शेतामध्ये जनावरांना वैरण सुद्धा नाही म्हणून नेहमी नाराज राहत होता बेचेन होऊन शेतामध्ये बसत होता.
घरातील सर्व मंडळींनी त्याला धीर देऊन काळजी करू नकोस कधी ना कधी आपले कर्ज फेडता येईल असे म्हणून त्याला धिर देत होते व संतोषची घरातील मंडळी समजूत काढत असे तरी ही तो नेहमीच आपल्याच विचारात असत . त्यांनी दिनांक २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संतोष बालाजी ताटे वय ३५ वर्षे राहणार पोखरभोसी ता. लोहा हा शेतामध्ये काम करत असताना तो बँकेचे कर्ज फिटत नसल्याने व सततच्या नापिकीमुळे स्वतःच्या शेतामध्ये कोणतेतरी विषारी औषध पिल्याचे ताटे परिवाराला समजतात पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखाना नांदेड येथे दाखल करण्यात आले.
उपचार चालू असताना दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मरण पावला असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले यावरून मयत संतोष बालाजी ताटे यांचे भाऊ दशरथ बालाजी ताटे यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष पी. उन्हाळे हे करीत आहेत.
आत्महत्या करून या तरूण शेतक-याने जिवन यात्रा संपविल्याने कूटंबावर व ताटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ होत आहे .त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी, आई – वडील ,भाऊ, बहीण, असा परिवार आहे .