हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात सकाळची चहाचे हाँटेल उघडण्या आगोदरच देशी विदेशी दारुची अवैध विक्री व दुचाकीद्वरे ग्रामीण भागात वाहतूक करण्यात येत आहे. या बाबतीत अनेक महीलांनी अश्या अवैध दारु विक्री संबंधी नेहमी आक्रोश लेखी निवेदन देवुन मागणी केली. मात्र संबंधित प्रशासनाकडून ठोस अशी दखल घेतली जात नसल्याने अवैधदारु विक्रेत्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
हदगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्याच्या मार्गानी येणाऱ्या पैशामुळे शहरात व परिसरात गुंडगीरी वाढत आहे. अवैध मार्गाने विकल्या जाणाऱ्या दारुला मोठी पसंती आहे. या दारूविक्री मागे कोणते ‘गुढ’ लपलेले आहे या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क विभाग आपले कारवाईचे अधिकार विसरले तर नाही ना..? अशी शंका पण जनतेत व्यक्त करण्यात येत आहे. कारण शहरात व तालुक्यात अश्या अवैध दारु विक्री संबधी कधी तरी स्थानिय पोलिस कारवाया करतांना दिसुन येत आहे.
या बाबतीत माहीती घेतली असता हदगाव तालुका हा राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवट तालुक्यात येतो. या विभागाची कामगिरीच अवलोकन केले असता सुमार दर्जाची कार्यशैली दिसुन येते. या उत्पादन शुल्क विभागाच काम पोलिस करतात की.. काय..? अशी नागरिकांत चर्चा ऐकवायास मिळत आहे. मागील काही दिवसापुर्वी जी कारवाई नादेड शहरात उत्पादन शुल्क विभाग करत होते त्या प्रकारची कारवाई हदगाव शहर तालुका स्तारावर का..? होत नाही असा सवाल ही निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातच नव्हे तर अति दुर्गम भागात हा दारुचा व्यवसाय जोमात आहे. सध्या हदगांव शहरासह तालुक्यात ‘नशामुक्त अभियान हे राबविणे अवश्यक झाले आहे. परंतु ऊत्पादन शुल्क विभाग नेमके करतोय काय…? अशी चर्चा पण ऐकवायास मिळत आहे. विशेष म्हणजे अश्या अवैध दारु विक्री अड्ड्यावर कधी तरी छापे टाकण्यात येतात. दारु बाटल्या बाँक्स जप्त करण्यात येतो माञ हा प्रकार उत्पादन शुल्क विभागाला का..? दिसु नये.
मिळालेल्या माहीती नुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक्साईज निरक्षक असतात. विशेष म्हणजे भरारी पथक सुद्धा असतात परंतु यांच्या कार्यशैलीचे अवलोकन केले असता शुन्यत्वाकडे असल्याचे दिसुन येत आहे. हदगाव शहरातील व परिसरामध्ये ढाबे हाँटेल्स या सार्वजनिक ठिकाणी विना परवाना दारु प्राशन करण्यास कायद्याने मनाई आहे. माञ हॉटेल्स, धाबे हे दारु पिण्याचे स्थान बनत असल्याच दिसुन येत आहे. ह्या विभागच भरारी पथक या बाबतीत ठोस कारवाई का करत नाही. असा सवाल ही जनतेत विचारला जात आहे.