१९ कोटीच्या नळ योजनेचे काम अर्धवट असल्यामुळे हिमायतनगरात पाणीटंचाईची समस्या
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासाठी मंजूर झालेल्या १९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा नळ योजनेचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने अनेक वॉर्डांमध्ये पाणीटंचाईची समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. परिणामी नागरिकांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे, यावर उपाय म्हणून नगरपरिषदेने तात्काळ सार्वजनिक विहिरींमध्ये पाणी सोडावे व बंद ठिकाणी बोअरवेल बसवून लोकांची तहान भागवावी. या पाणीप्रश्नाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी पाइपलाइन प्रकल्पाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे केली. व जनतेची तहान भागविण्यासाठी नगर पंचायत संकुलातील विहिरीत पाणी सोडावे अशी मागणी एक अनिवेदनाद्वारे केली आहे.
गतवर्षी 20 डिसेंबर 2023 रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील यांनी 19 कोटी रुपयांच्या नळ योजनेबाबत शहरातील नळ योजनेचे काम करणारे ठेकेदार, अभियंते व नगर पंचायत यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. मंजूर नळ योजनेच्या कामाचा आढावा जाणून घेतल्यानंतर आमदार माधव पटेल जवळगावकर यांनी संबंधित ठेकेदाराला नळ योजनेचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करून नवीन वर्षापासून जनतेला पाणी उपलब्ध करून देण्याची सक्त ताकीद दिली होती. जनतेला पाणी मिळाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असे त्यांनी ठेकेदारास ठणकावून सांगितले होते.
मात्र जानेवारी महिन्याला 10 दिवस उलटूनही सदरचे नाळ योजनेचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून या नळयोजना पाइपलाइन प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र कामात प्रगती होत नसल्याने दिवाळीपासून शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता पाण्याची पातळी खालावल्याने नागरिकांनी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी नागरिकांना दिवस रात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत नगर पंचायतीकडे समस्या मंडळी तरी काहीही उपयोग होत नाही, यामुळे वॉर्ड क्रमांक १२ व ८ मधील नागरिकांनी याबाबतची समस्या आमदार जवळगावकर यांच्यापुढे मंडळी आहे. शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. यावेळी काँग्रेस नेते डॉ.अंकुश देवसरकर, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सभापती गणेशराव शिंदे, दत्तात्रेय काळे, रामभाऊ सूर्यवंशी, विलास वानखेडे आदी उपस्थित होते.
केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर शहरातील जनतेला मागील सात वर्षांपासून १९ कोटीच्या नळयोजनेने पाणी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ठेकेदाराने नळयोजनेचे काम करताना कोट्यवधींच्या निधीतून केलेलं सिमेंट रस्ते फोडून शहरातील रस्ते खड्डेमय करून ठेवले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत असून, यास केवळ ठेकेदारांचा मनमानी कारभार व देखरेख करणाऱ्या अभियंत्यांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार आहे. त्यामुळे नळयोजनेच्या कामात दिरंगाई आणि आमदार जवळगावकर यांच्या आदेशाला केराची टोपली दखविल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
नळयोजना फेल गेली तर पाण्यासाठी एकमेकांचे डोके फोडून घेण्याची वेळ येणार
प्रत्यक्षात ७ वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या नळयोजनेचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने शहरातील नागरिकांना दिवाळीच्या पर्वकाळापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, आत्ता तर पाणी पातळी खोल गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नळयोजनेचा काम सुरु होण्यापूर्वी शहराच्या चारही बाजूने ४ ते ६ ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे अनिवार्य होते. मात्र काम सुरु झाल्यापासून केवळ तीन टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्याचेही काम अर्धवट स्थितीत असून, एकाच ठिकाणी दोन टाक्या बांधल्या असल्याचे प्रत्यक्षात दिसते आहे. त्यामुळे जनतेला 19 कोटींच्या निधीतील 80 टक्के रक्कम खर्च होऊन पाणी मिळेल कि नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जर पाणी पुरवठा योजना फेल गेली तर पाण्यासाठी नागरिकांना एकमेकांचे डोके फोडून घेण्याची वेळ येणार आहे.