संभाजीनगर/नांदेड| गायरान भूखंडाची बॉण्डवर परस्पर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर, व्यापाऱ्यावर व डोळे झाक करणाऱ्या अधिकारी यांच्यावर योग्य गुन्हे दाखल करून शासनाचे गायरान असलेला भूखंड भूमाफियाच्या घशातून वाचवा. या मागणीसाठी उपोषण कर्ते विद्या वाघमारे व मारोती शिकारे विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर/औरंगाबाद येथे दि. 27 डिसेंबर रोजी अमरण उपोषणाला बसले आहेत. यामुळे हदगाव शहरातील गायरान जमीन असलेल्या भूखंडाचे श्रीखंडात रूपांतर करण्यात भूमाफिया सक्रिय झाले असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.
हदगाव शहरातील हदगाव ते तामसा मुख्य रस्त्यालगत शासनाची काही गायरान जमीन होती. ही गायरान जमीन अनेक शेतकऱ्याच्या ताब्यात होती. सदरील शेतकऱ्यांनी व्यापारी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला हे भूखंड करोडो रुपयाला विकला असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. सदरील व्यापारी मात्र त्या भूखंडाचे प्लॉटिंग मध्ये रूपांतर करून विक्री करून खाण्यात मशगुल झाला असल्याची चर्चा संबंध हादगाव तालुक्यात होत आहे. सदरील गायरान भूखंडाची बॉण्डवर परस्पर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर, व्यापाऱ्यावर व डोळे झाक करणाऱ्या अधिकारी यांच्यावर योग्य गुन्हे दाखल करून शासनाचे गायरान असलेला भूखंड भूमाफियाच्या घशातून वाचवा. या मागणीसाठी उपोषण कर्ते विद्या वाघमारे व मारोती शिकारे विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दि. 27 डिसेंबर रोजी अमरण उपोषणाला बसले आहेत. पंरतु उपोषण कर्ते यांना न्याय मिळेल कि, प्रशासन भुमाफीयाना साथ देईल. या विषयी हदगाव शहरात जनतेत खमंग चर्चा होताना दिसत आहे.
याबाबत उपोषणकर्त्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आज आमचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस चालू आहे. जोपर्यंत संबंधित प्रकरणावर योग्य कार्यवाही होणार नाही. तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. ज्या संबंधित मंडळ अधिकारी व तहसीलदार साहेब यांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे जो चुकीचा अहवाल पाठविला आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करावी व त्यांना सेवेतून कार्यमुक्त करा अशी मागणी आम्ही करणार आहोत असे हि ते म्हणाले. हदगाव शहरातील गायरान जमिनीवर प्लॉटिंग टाकून योग्य रस्त्याचे नियोजन करून त्यात आकर्षक असे रस्ते दाखवून लाखो रुपयाला हे प्लॉट विकले जात आहेत. हे प्लॉट विकण्यासाठी काही एजंटाला प्लॉट साठी ग्राहक आणून देण्यास त्यांना प्लॉटिंगच्या पैशात हजारो रुपये मिळत आहेत. त्यामुळे बरेच बरेच दलाल या कामात गुंतले असल्याची चर्चा हदगाव शहरात आहे. गायरान जमिनीवरील भूखंड प्रकरणात हदगाव कर्तव्यदक्ष तहसीलदार काय भूमिका घेतात हे येणारा काळच ठरवेल.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालय हद्दीत असलेले शेत सर्वे नंबर 225/1/22, 225/1/24, 225/2, 225/19, 226 / 3, 226/19, 226/13 हे भूखंड गायरान जमिनीचे असून ते भूखंड भूमाफिया कडून विक्री होत असल्याबाबत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने पत्र काढून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यामुळे, 13 डिसेंबर रोजीचे नियोजित आमरण उपोषण प्रशासनाचा मान राखून तात्पुरते स्थगित केले होते. कार्यवाही लवकरात लवकर नाही झाल्यास, आम्ही पुन्हा आमरण उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला होता. त्याचवेळी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथून कार्यवाहीला तात्काळ सुरुवात झाली होती. जायमोक्यावर जाऊन स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. तेव्हा मंडळ अधिकाऱ्यांनी चक डोळ्यावर पट्टी बांधून जायमोक्यावरचा अहवाल सादर केला. त्या अहवालावरून तहसीलदार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयास कळविले की सदर प्रकरणात काहीच पुरावे सापडत नसल्यामुळे प्रकरण निकाली काढण्यात यावे. तेव्हा उपोषणकर्त्यांनी तात्काळ त्यांच्याकडील पुरावे विभागीय आयुक्त कार्यालयास सादर केले असता तहसीलदार साहेबांचा प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न असफल ठरला.