नांदेड। अनोळखी आरोपीची माहीती पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केली असून, दिनांक ११/१०/२०२३ रोजी भाग्यनगर पोलीस ठाणे येथे त्या अज्ञातावर गु.र.क्र.३७३/२०२३ कलम ३०७, ३९४,३९७, ४५२,३४२, ५०६, भा.द.वि. सहकलम ५/२७, २७ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असुन, सदर घटनेचा तपास विनोदल चकाण सहायक पोलीस निरीक्षक भाग्यनगर पोलीस ठाणे, नांदेड हे करीत आहेत.
भाग्यनागर पोलीस ठाण्याच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेसनोट अनुसार दिनांक १०/१०/२०२३ रोजी दुपारी १२.३० वाजण्याचे सुमारास फिर्यादी महीला शुभांगी आशिष दोडके वय ३८ वर्ष, व्यावसाय गृहीणी रा. व्यंकटेश्वरानगर, अपोझीट वैभव जिस कॅनॉल रोड नांदेड हया त्याच्या राहत्या घरी एकटया होत्या. त्यावेळी एक अनोळखी इसम येऊन त्यांना येथे गोर व जाधव राहतात काय ? असे विचारून त्यांना एलआयसीचे कागदपत्रे द्यावयाचे आहे. असे म्हणुन ” मला एक ग्लास पाणी द्या ” असे म्हणून पिण्यासाठी पाणी मागीतल्याने फिर्यादी महीला पाणी आणण्यासाठी घरात गेली.
यावेळी सदर अनोखी आरोपी हा फिर्यादीच्या पाठीमागेच घरात घुसुन फिर्यादी महीलीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून फरशीवर डोके आपटुन गंभीर जखमी केले. तसेच धारदार चाकुने मारून करून गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसुत्र व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन गेल्याने फिर्यादीच्या तक्रारी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्या अनोळखी आरोपीचे वर्णन व त्याचे काढलेले रेखाचित्र (स्केच ) जारी करण्यात आलेल्या प्रेसनोट मध्ये दिले आहे.
एक अनोखी आरोपी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष, बांधा मध्यम, वर्ण- सावळा, उंची अंदाजे साडेपाच फुट, भाषा गुन्हा करताना मराठी. सदर आरोपीचा शोध होण्यासाठी आरोपी इसमाच्या वर्णणाची माहीती पोलिसांनी वृत्तपत्र माध्यमांना प्रसीध्दी होण्यास दिली आहे. सदर वर्णणाचा आरोपी मिळुन आल्यास तात्काळ भाग्यगनर पोलीस ठाणेस कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले असून, भाग्यगनर पोलीस दाणे फोन नं. २४६२२६१३६४. पोलीस निरीक्षक भाग्यनगर पो. ठाणे श्री. बोलमवाड साहेब मो.नं. ८८८८५५३३४. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण ७०२०४०८५९५, ९७६३७७४७७७४ तपासी 1 अधिकारी (विनोदल चकाण) सहायक पोलीस निरीक्षक भाग्यनगर पोलीस ठाणे, नांदेड यांना कळविण्यात यावं असं आवाहन करण्यात आले आहे.