हदगाव,शे. चांदपाशा| नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्याच्या विजयाने हिगोली लोकसभा मतदार संघात दावेदार वाढत आहे. विशेष म्हणजे हिगोली लोकसभाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव विधानसभा क्षेञांत भाजपा कमजोर असल्याच आज पर्यंतचे चिञ होते. परंतु गेल्या काही वर्षापासून हदगाव तालुक्यात माञ भाजपा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामीण भागात सक्रिय झाल्याचे चिञ आहे. विशेष म्हणजे तीन राज्याच्या विजयाने माञ हदगाव तालुक्यात त्याचे परिणाम उमटल्याचे दिसुन येत आहे.
तसा हदगाव तालुक्यात भाजपा पक्ष केवळ नावालच होता. कार्यकर्ते माञ तितके सक्रिय दिसुन येत नव्हते ही वस्तुस्थिती आहे. माञ आता पदधिका-यांच्या नव्या निवडीने व अनेक युवकाना मानसम्मान मुळे माञ नवचैतन्य दिसुन येत आहे विशेष सुपर वाँरियर्स क्रियाशील दिसुन येतात. तसेच ग्रामीण भागातील नेमक्या काय समस्या याची संपूर्ण जाणीव असणारे भाजपाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील व त्यांची टिम यांनी यापुर्वी पक्षाचे कोणतेही पद नसतांना आपल्या कार्याची चुणुक दाखवली. त्याच्या कार्याची दखल घेत भाजपाच्या जबाबदार नेत्यांनी त्यांना भाजपाच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. हदगाव तालुक्यात भाजपाच्या विविध बैठक द्वरे त्याचे नियमित कार्य करत असल्याचे दिसुन येत आहे.
अणखी विशेष म्हणजे हिगोली लोकसभा मतदार संघातील भाजपा तर्फ रामदास पाटील सुमठाणकर, डाँ श्रीकांत पाटील व रामराव वडकुते अन्य जणांजी नावे प्रामुख्याने चर्चित असले तरी त्यांचे दौरे तालुक्यात वाढलेले आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे सयोजक रामदास पाटील सुमठाणाकर यांनी माञ तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलाच संपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमद्वरे पोहचलेले आहेत हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. अणखी विशेष म्हणजे गावातील युवकाना भाजपा मध्ये आणण्यात इतर स्थानिय पदाधिका-या सोबत त्याचा पण सहभाग असतो हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.