विहिंप बजरंग दलातर्फे शौर्य यात्रेचे शुक्रवारी समारोप. शुक्रवारी शुभारंभ मंगल कार्यालयात होणार कार्यक्रम
नांदेड। विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला साठ (६०) वर्षे पूर्ण होत आहे हे वर्ष विश्व हिंदू परिषदेचे षष्ठीपूर्ती वर्ष आहे या निमित्ताने वर्षभर देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्य विभागाच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या षष्ठीपूर्ती वर्षानिमित्ताने बजरंग दलाच्या वतीने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्काराचे व्यापक जनजागरण व्हावे तसेच हिंदू साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत हिंदूपदपातशाही रूपाने नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण सर्व हिंदू समाजाने करावे राष्ट्र जागरण कार्यातील महाराजांच्या योगदानाबाबत समाजातील महाराजांविषयीचा कृतज्ञतेचा भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पुढाकाराने सकल हिंदू समाजाच्या सहभागाने देवगिरी प्रांतामध्ये भव्य शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले .
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही यात्रा भ्रमण करीत असून शुक्रवारी दिनांक १३ रोजी सायं ५:३० वाजता या यात्रेचा समारोप शुभारंभ मंगल कार्यालय आयटीआय येथे होणार असून महावीर मिशन ट्रस्ट हैदराबाद येथील राष्ट्रसंत पूज्य मुनी श्री निलेशचंद्रजी महाराज, अयोध्येचे आखाडा परिषदेचे सदस्य आचार्य सुनील शास्त्री महाराज व ष.ब्र १०८ डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर अध्यक्षस्थानी डॉ. हंसराज वैद्य असणार आहेत, तरी सर्व हिंदू जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.