कंधार, सचिन मोरे। दि.०८ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे हॉटेल ताज पटेल प्लाझा मध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य कार्तिक बेहरे, विभागीय अध्यक्ष जयश्री भरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कंधार तालुका पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार संघपाल वाघमारे बारूळकर यांची निवड करण्यात आली. या ठिकाणी जमलेल्या युवा पत्रकारांना संबोधित करत असताना मराठवाडा विभागीय संघटक परमेश्वर पेशवे यांनी संघटनेतील पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर राहणार त्याचबरोबर ग्रामीण भागातील विकास कामासंदर्भात जनतेच्या अडीअडचणी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट मांडली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी आपले मत व्यक्त करत असताना समाजातील तळागाळातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या युवा पत्रकार संघटनेची स्थापना झाली. तेव्हा सर्व पत्रकार बांधवांनी कुठल्याही संघटनेची आपली स्पर्धा न ठेवता आपण आपल्या कामाची स्पर्धा ठेवावी व जनमानसात आपली प्रतिमा उजळ राहावी यासाठी सदैव प्रयत्न करावे. व समाजातील प्रत्येक माणसाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर आहे. असे मत व्यक्त केले.
या बैठकीत खालील पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली असून युवा पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी गंगाधर सूर्यवंशी, जिल्हा संघटक पदी प्रभाकर पांडे, युवा अध्यक्ष सुहास मुंडे, नांदेड शहर अध्यक्ष कैलास जाधव, कंधार तालुका अध्यक्ष संघपाल वाघमारे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप वानखेडे अर्धापूर तालुका अध्यक्ष मन्मथ भुसे, नायगाव तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे, नांदेड जिल्हा सचिव बालाजी अंभोरे, नांदेड शहर अध्यक्ष महंमद सुलेमान खान, जिल्हाध्यक्ष ईश्वर देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शितल महाजन, जिल्हा सहसचिव राहुल कांबळे, शहर सचिव पदी मोहम्मद रफीक यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली व पुढील कार्यासाठी या पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्तिक बेहरे यांनी आभार व्यक्त केले.