उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे जोशी सांगवी ता.लोहा येथे १०लक्ष सि.सि.रस्त्याचे भुमिपुजन लोहा-कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आले.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सर्व संचालक यांचा जोशीसांगवी गावकरी मंडळी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित होते. सर्वप्रथम आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांचे जोशीसांगवी नगरीत आगमण होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदारपणे स्वागत करुन शेतकरी कामगार पक्षाच्या बैलगाडीत आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व सौ.आशाताई शिंदे यांना बसवुन गावातुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व सौ.आशाताई शिंदे यांचे घरोघरी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी स्वप्निल पा. उमरेकर संचालक, श्याम अण्णा पवार खरेदी विक्री संघ उपसभापती लोहा, अवधुत पा.शिंदे शेकाप जिल्हाध्यक्ष नांदेड, माणिकराव पा.वाकडे संचालक, विश्वंबर पा.क्षीरसागर संचालक, धोंडीबा पाटील पवार संचालक,अण्णासाहेब पवार संचालक, मधुकरराव डाकोरे संचालक, अशोक पाटील डरके, बालाजी पाटील चेअरमन किवळा, बंडु पा.पवार संचालक, राजु पा.वडवळे माजी सरपंच कापशी, फुलाजी पाटील ताटे सरपंच, वंदनाताई परमेश्वर परमेश्वर थोटे सरपंच जोशीसांगवी,आरतीताई मोरे (उपसरपंच) विक्रम पाटील मोरे, बाळू अनंदवाड,आनंदराव देशमुख, सचिन पा.कुदळकर, हनुमंत पाटील डोनवाडेकर शेकाप जिल्हा सचिव नांदेड तथा उपसरपंच डोनवाडा,सिद्धू पा.वडजे, राजु पा.शिंदे, सतीश पाटील शिंदे ढाकणीकर, अशोक पा.टरके, सुधाकर सातपुते,जमीर पठाण,व्यंकटी पा.आढाव, हानमंत पोकले, गोविंद पा.ढाकणीकर, सिकंदर शेख,प्रशांत पा.आढाव, व उपस्थित सर्व सदस्य ग्रामपंचायत जोशीसांगवी व महिला भगिनी पदाधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते.