नांदेडमध्ये सोमवारी दोन अर्ज दाखल; आतापर्यत एकूण ५ अर्ज दाखल ४ एप्रिलपर्यंत मुदत ; १०८ अर्जाची उचल

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज सोमवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक, शानिवारी दोन तर आज सोमवारी दोन असे एकूण आतापर्यंत ५ अर्ज दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत १०८ अर्जाची उचल झाली आहे.४ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे.

आतापर्यंत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण, अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर, अकबर अख्तर खॉन, साहेबराव भिवा गजभारे,  जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. २८ मार्च  ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून पुढील ३ दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!