
नांदेड। काल दिनांक 25.10.2023 रोजी फिर्यादी मोहम्मद फैजउल्ला मोहम्मद हिदायतऊल्ला रा. दर्गापूरा कंधार यांनी पोलीस ठाणेस हजर येऊन फिर्याद दिली की, ते नातेवाईकांसोबत दवाखाण्याचे कामासाठी नांदेडला आले असतांना सकाळी 11.30 वाजताचे सुमारास कलामंदीर येथे मोबाईल फोनवर बोलत जात असतांना दोन इसम लाल रंगाच्या स्कुटीवर आले व त्यांनी कानाला लावलेला मोबाईल फोन बळजबरीने चोरुन घेऊन गेले वगैरे फिर्यादीवरुन पो.स्टे. वजीराबाद, नांदेड येथे गु.र.न. 467/2023 कलम 392,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासकामी सदरचा गुन्हा सपोनि राम केंद्रे यांचेकडे
देण्यात आला. दुर्गादेवी विसर्जणाचे दिवशी मोबाईल स्नॅचींगचा प्रकार घडला असल्याने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदड शहर यांनी सदरचे मोबाईल स्नॅचींग करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांना सुचना केल्या.
सदर सुचनांप्रमाणे पो.नि. अशोक घोरबांड यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे सहा, पो.नि. पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोना शरदचंद्र चावरे, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, शेख ईम्रान, पोकॉ भाऊसाहेब राठोड यांना घटना घडलेल्या परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करुन तसेच बातमीदार यांचेशी चर्चा करुन आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कलामंदीर परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करीत असतांना त्यामध्ये शहर वाहतुक शाखेचे एक वाहन पट्रोलींग करीत असतांना आढळुन आले. सदर वाहनातील अधिकारी व अंमलदार यांना घटनेबाबत विचारणा केली असता शहर वाहतुक शाखेचे वाहन चालक सुरेश लोणीकर यांचेकडे असलेल्या दंड आकारण्याच्या डिव्हाईसमध्ये काही वाहनांच्या फोटो काढण्यात आलेल्या आढळुन आल्या. त्यामधील फोटोंची फिर्यादीकडुन पाहणी करुन घेतली असता त्यामध्ये एक स्कुटी चालकाचा फोटो आढळुन आला. त्यावरील दोन इसमांनीच माझा मोबाईल चोरी केला असल्याच फिर्यादीने पाहुन सांगितले. सदर काढण्यात आलेल्या फोटोमधील वाहनाचे क्रमांकावरुन वाहन मालकांचा शोध घेतला असता
सदरचे वाहन अक्षयकुमार किशोर घोगरे रा. शिवनगर नांदेड यांचे असल्याचे खात्री झाली. त्यांचेकडे चौकशी करता वाहन त्यांचा मुलगा ओमकार यानी घेऊन गेले होते अशी माहीती प्राप्त झाली. त्यावरुन सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता ओमकार किशोर घोगरे, वय 23 वर्षे व्यवसाय बेकार राहणार दत्तमंदीरजवळ शिवनगर नांदेड व त्याचा मित्र गणेश राजाराम हिवराळे, वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार शिवनगर बायपास रोड नांदेड या दोघांनी सदरचा मोबाईल स्नॅचींग केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन फिर्यादीचा बळजबरीने चोरी केलेला मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली स्कुटी असा एकुण 50,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपीतांना पुढील तपासकामी सपोनि राम केंद्रे व पोकॉ गणपत राठोड यांचेकडे दिले. त्यांनी नमुद आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतांना दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन त्यांचेकडे ईतर गुन्हयांचे अनुषंगाने तपास चालू आहे सदरचा गुन्हा 24 तासाचे आत उघडकीस आणलेबद्दल वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.
