अर्धापुर/पार्डी। नापिकी व कर्जास कंटाळून अर्धापुर तालुक्यातील चोरंबा येथील तरुण शेतकरी राणोजी उत्तमराव नरोटे वय – २९ या शेतकऱ्याने दि .१० जानेवारी रोजी रात्रीला १० वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतातमधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळपास लावून आत्महत्या केली आहे .हा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून वडिलांच्या नावावर अडीच एकर शेती असून वडिलांच्या नावे बँकेचे कर्ज होते .
मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये उत्पन्न मिळत नव्हते कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टीमुळे नापिकी होत असे आणि बँकेचे असलेले एक लाख कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मयत तरुण शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना देण्यात आली आहे . याप्रकरणी अर्धापुर पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .त्याच्या पश्चात पत्नी आई – वडील व एक भाऊ असा परिवार आहे .
१० जानेवारी रोजी सायंकाळी मी शेताकडे जात असल्याचे पत्नी ,आई वडील यांना सांगून शेताकडे गेला होता .त्यानंतर त्याने स्वतःच्या शेतामधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे .भावाला शेतामधून येण्यास उशीर होत असल्याने लहान भाऊ शेतामध्ये गेला असता त्यांनी भावाने झाडाला गळपास घेतल्याचे दिसून आले .वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक लाखाचे कर्ज होते .अशी माहिती नातेवाईकांनी सांगितले आहे .